नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात वार्षिक स्नेह संमेलनास विविध क्रीडा स्पर्धांनी सुरुवात.

दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी ने.सु.बो. महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांकरीता विविध मनोरंजक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये सीट अप, पुश अप, मुलींकरिता दोरीवरच्या उड्या, इत्यादी मनोरंजक क्रीडा प्रकार आयोजित करण्यात आले होते. या क्रीडा प्रकारांमध्ये पुश अप या प्रकारात सर्वप्रथम पंकज झाडे आणि द्वितीय अभिषेक पळसकर आणि शेख यासर यांनी पटकावले.
सीट अप या प्रकारात स्वराज बोरगावे प्रथम तर पंकज झाडे यांनी द्वितीय पारितोषिक पटकावले.
दोरीवरच्या उड्या या स्पर्धा प्रकारामध्ये कोमलकौर जाधव प्रथम तर पायलकौर जाधव यांनी द्वितीय पारितोषिके पटकावली.
सदरील क्रीडा स्पर्धेचे आयोजन आणि नियोजन डॉ. पंकज यादव यांनी केले आणि या स्पर्धेकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र कुमारकुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. कल्पना कदम, वार्षिक स्नेहसंमेलनाचे प्रभारी डॉ. जीवन मसुरे यांच्यासह एन.सी. सी. विभाग प्रमुख लेफ्टनंट डॉ. किशोर इंगळे डॉ.अतिश राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.