स्व. बाळासाहेब ठाकरे स्वच्छ बस स्थानक अभियानांतर्गत नांदेड येथील अधिकाऱ्यांनी मानवत बस स्थानकाचे निरीक्षण

मानवत/प्रतिनिधी
*——————————————*
महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्व. बाळासाहेब ठाकरे स्वच्छ बस स्थानक अभियान पूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. आज दि.15 मे रोजी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ बस स्थानक अभियानांतर्गत मूल्यांकन समितीचे नांदेड येथील विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी अध्यक्ष सौ.वंदना सुरेश चापोलीकर,व एस टी महामंडळाचे नांदेड विभागाचे वाहतूक अधिकारी मिलिंद पुरबाजी सोनाळे अ.प.नांदेड यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ बस स्थानक अभियानांतर्गत आज रोजी भेट देऊन स्वच्छतेबाबत निरीक्षण केले व योग्य त्या सूचना दिल्या. या अभियान अंतर्गत चार वेळा बस स्थानकाचे निरीक्षण करण्यात येणार आहे. आपले बस स्थानक कसे सुंदर व स्वच्छ राहील याबाबत नांदेड विभागाचे वाहतूक अधिकारी व मूल्यांकन समितीचे सदस्य मिलिंद पुरभाजी सोनाळे यांनी मानवतबस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक तेलभरे यांना सूचना करण्यात आल्या.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे परभणी जिल्हा माजी अध्यक्ष, व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ बस स्थानक अभियानांतर्गत विभागीय मूल्यांकन समितीचे माजी सदस्य के.डी.वर्मा व प्रवासी म्हणून नगर पालिका चे कर्मचारी लक्ष्मण रापतवार उपस्थित होते.
***