यशवंत ‘ च्या राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिराचे उद्घाटन उत्साहात संपन्न

*’
नांदेड:( दि. ६ जानेवारी २०२५)
राष्ट्रीय सेवा योजना, यशवंत महाविद्यालयाचे सात दिवसीय निवासी शिबिर दि.५ जानेवारी ते ११ जानेवारी या कालावधीत मौजे मरळक, ता. जि.नांदेड येथे संपन्न होत आहे.
शिबिराचे उद्घाटन माजी पालकमंत्री मा.श्री.डी.पी.सावंत यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मरळकचे उपसरपंच बालाजी पाटील कदम होते. प्रमुख अतिथी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य मा.श्री. नरेंद्र चव्हाण, प्रतिष्ठित नागरिक गंगाधरराव पाटील कदम होते. प्रमुख उपस्थिती माजी प्र- कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे आणि उपप्राचार्य डॉ. हरिश्चंद्र पतंगे यांची होती.
उद्घाटनपर मनोगतामध्ये मा.डी. पी.सावंत यांनी, विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन जोपासण्याचा मंत्र दिला. आज जिथे सर्वत्र नकारात्मकता पसरलेली असताना सकारात्मक विचारांची पेरणी विद्यार्थ्यांनी करणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले तसेच विद्यार्थ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान अवगत करून सर्वांगीण विकास करून घ्यावा; असे मत मांडले.
प्रमुख अतिथी श्री. नरेंद्र चव्हाण यांनी, विद्यार्थ्यांनी भविष्यातील संधी ओळखून त्या पद्धतीने स्वतःमध्ये बदल करण्याचे आवाहन केले. भूतकाळात न रमता मन, मनगट आणि मस्तक याचा सदुपयोग करून रोजगारांच्या नवीन संधीसाठी तयार राहण्याचे आवाहन केले.
यावेळी ग्रामस्थ बळीराम पाटील कदम, अक्रूर कदम, तुकाराम कदम, सुग्रीव कदम तसेच जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.कांबळे उपस्थित होते.
सूत्रसंचालन डॉ.शिवाजी सूर्यवंशी यांनी तर प्रास्ताविक डॉ.कैलास इंगोले यांनी केले. शेवटी आभार प्रा.राजश्री भोपाळे यांनी मानले.
कार्यक्रमासाठी डॉ. राजरत्न सोनटक्के, प्रा.अभिनंदन इंगोले, डॉ. श्रीराम हुलसुरे, प्रा.गायकवाड आणि स्वयंसेवक व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे, जगन्नाथ महामुने, नाना शिंदे आदींनी सहकार्य केले.