https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत नगर परिषदेच्या वतीने केंद्र व राज्यस्तरीय विविध कार्यक्रम साजरे मुख्याधिकारी } कोमल सावरे.

मानवत / प्रतिनिधी.
मानवत येथे ०८ डिसेंबर रोजी हर घर आयुर्वेद नगरपरिषद मानवतचा अभिनव उपक्रम तसेच माझी वसुंधरा अभियान ४.०, स्वच्छ सर्वेक्षण २०२२-२४ मध्ये मानवत नगर परिषदेने ही सहभाग नोंदविला असून अभियानांतर्गत शहरात स्वच्छतेची विविध कामे चालू आहेत. घरोघरी जाऊन संकलन करण्यात येणाऱ्या कचऱ्यापासून सोन म्हणजेच कंपोस्ट खत तयार करण्याचे काम प्रगती पथावर चालू आहे. अशी अनेक कामे मानवत शहरात मुख्याधिकारी तथा मुख्य प्रशासक श्रीमती कोमल सावरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहेत. दोन्ही योजना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार रबविण्यात येत आहेत. सदर अभियानांतर्गत शहरात वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन मागील काही महिन्यापासून चालू आहे. या वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये मानवत शहरातील महिला, नागरी, विद्यार्थी, व्यापारी, संस्था, बचत गट इत्यादी मार्फत सुद्धा सदर अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला जात आहे. याचा दृष्टिकोन असा आहे की सदर अभियानाची व्यापक प्रसिद्धी शहरात व्हावी हा आहे. राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धेच्या निकाला साठी नगरपरिषद स्तरावर एक समिती नेमण्यात आली आहे या समितीने आपला गोपनीय अहवाल माननीय मुख्याधिकारी नगरपरिषद मानवत यांच्या कडे सोपविला आहे. या मधील उत्कृष्ट स्पर्धकांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम सुद्धा आज रोजी घेण्यात आला. घेण्यात आलेल्या वेगवेगळ्या स्पर्धांचे पारितोषिक वितरण विषय विवरण असे की हर घर नर्सरी स्पर्धा यामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक श्रीमती ज्योती कैलास मिसाळ यांना देण्यात आले असून पारितोषिकाचे स्वरूप ३ हजार ०१ रुपये प्रशस्ती प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ, दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक श्रीमती छाया घनश्याम साबळे यांना देण्यात आले असून पारितोषिकाचे स्वरूप ०२ हजार ०१ रुपये प्रशस्ती प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ, तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक श्रीमती उषा मारोतराव कच्छवे यांना ०१ हजार ०१ रुपये प्रशस्ती प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ, उत्तेजनार्थ पारितोषिक प्रमाणपत्र श्रीमती सांची संजय जोंधळे यांना वितरित करण्यात आले. याच बरोबर पर्यावरण पूरक गणेश उत्सव स्पर्धा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक श्रीमती रेवती राजेंद्र भरड यांना २ हजार ०१ रुपये प्रशस्ती प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ, तसेच द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक श्रीमती मंगल श्रीरंग सोरेकर यांना ०१ हजार ५०१ रुपये प्रशस्ती प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ, वितरण करून सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती. राणीताई अंकुशराव लाड ह्या होत्या तर प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती विजया बांगड, श्रीमती. अनिता पोरवाल, श्रीमती. शितल कुऱ्हाडे, श्रीमती. शोभा चव्हाण, प्रमुखव्याख्याता डॉ. श्रीमती शरयूताई खेकाळे उपस्थित होत्या.
श्रीमती कोमल सावरे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी उपस्थित महिलांना नगरपरिषदेच्या वेगवेगळ्या योजना अभियान तसेच कार्यालया विषयी माहिती देताना असे संबोधित केले की मानवत शहरातील सर्व नागरिकांनी महिलांनी वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदवावा व आपल्या मानवत शहरास एक नावलौकिक द्यावा तसेच नगर परिषदेस सहकार्य करावे, स्वच्छता राखण्यास सहकार्य करावे, त्याच बरोबर हर घर आयुर्वेद, हर घर ध्यान माध्यमातून आर्ट ऑफ लिविंग च्या ध्यान साधनेच्या माध्यमातून आपण आपली मानसिक व शारीरिक स्थिती सुधारावी व आरोग्यमय आनंदी जीवन जगावे. प्रमुख मार्गदर्शिका म्हणून डॉ. श्रीमती शरयू खेकाळे यांनी घराततील वेगवेगळे वस्तू, पदार्थ, वनस्पती, इत्यादी पासून आपण आपले शारीरिक स्वास्थ कसे अबाधित राखू शकतो या विषयी सखोल असे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि सूत्रसंचालन श्री. हनुमंत बिडवे यांनी केले. या कार्यक्रमास नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक श्री. भगवानराव शिंदे, श्री. अन्वर सय्यद, श्री.संतोष उन्हाळे, श्रीमती वंदना इंगोले, श्री आडसकर, श्री. राजेश शर्मा, भगवान बारटक्के, सोनाजी काळे, रवी दहे, मनमोहन बारहाते, रुद्रवार, सातभाई, शिवाजी कच्छवे, रावसाहेब झोडपे, पंकज पवार, शेख वसीम, रितेश भदर्गे, सचिन सोनवणे, बाळाभाऊ लाड, मुंजा डोळसे, संजय कुऱ्हाडे, नारायण व्यवहारे, सुनील किर्तने, दिपक भदर्गे, सुनिता वाडकर, श्रीमती कंची, श्री. अलीम अन्सारी, श्रीमती रेखा मनेरे श्रीमती सिंधुताई धुमाळ यांच्या सह नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी आणि शहरातील महिला या कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित होत्या.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704