ताज्या घडामोडी

औद्यगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज करा : प्रभारी प्राचार्य चंद्रशेखर देशपांडे.*

मानवत / प्रतिनिधी.

आय टी आय प्रवेशासाठी २६ जून पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत शासकिय आय टी आय प्रवेशासाठी ग्रामीण व शहरी दहावी परीक्षा ऊत्तीर्ण उमेदवारांनी २६ जून पर्यंत अर्ज करावेत असे आवाहान प्रवेश समिती सह समन्वयक एम . एस . सोनवळकर यांनी केले आहे. मानवतच्या शासकिय आय टी आय मध्ये इलेक्ट्रेशियन – २० ड्राप्टसमन सिव्हील – २४ वायरमन २० मशिनिस्ट २० ‘ फिटर २० या दोन वर्षीय मुदतीच्या ट्रेड साठी तर ट्रॅक्टर मेकॅ . ४० वेल्डर ४० एक वर्षीय मुदतीच्या ट्रेड साठी प्रवेश प्रक्रीया चालू आहे सर्व ट्रेड मध्ये प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थीस ५०० रू प्रतिमाह विद्यावेतन मागील दोन वर्षा पासून शासनामार्फत दिले जाते प्रवेश प्रक्रीया शुल्क सर्व मागास प्रवर्ग ऊमेदवार व इडब्ल्युएस ‘ एसईबीसी उमेदवारांस ९५० व १२५० एकुन शुल्क असून ईतर सर्व खुल्या प्रवर्गातील ऊमेदवारांना ३२५० ‘ ते ३६५० पर्यंत प्रवेश शुल्क भरून गुणवत्तेनुसार पसंतीच्या ट्रेड साठी प्रवेश कायम करता येतो
मागील वर्षी ऊत्तीर्ण झालेल्या पैकी विद्युत मंडळात इलेक्ट्रेशियन व्यवसायाचे ११ उमेदवारांची स्पर्धा परीक्षिव्दारे नौकरी साठी निवड झाली आहे तर आरेखक स्थापत्य सिव्हील ट्रेड चे ०६ उमेदवार जलसंपदा विभागात तर ०४
ऊमेदवार L & T सारख्या नामांकीत कंपनीत म्हणजे एकुण १० उमेदवारांची निवड स्पर्धा परिक्षा व्दारे नौकरी साठी झालेली आहे
तसेच वायरमन ‘फिटर ‘ वेल्डर ‘ मशिनिस्ट ‘ ट्रॅक्टर मेकॅ . ट्रेड च्या ऊमेदवारांना नामांकीत कंपन्या मध्ये नौकरी व स्वयंम रोजगाराच्या मोठया संधी आहेत रेल्वे विभाग ‘ एस टी महामंडळे व विवीध कंपन्या मध्ये १० हजार पेक्षा जास्त जागा या वर्षात भरल्या जाणार असल्याने
आय टी आय अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या ग्रामिण बेरोजगारासाठी आय टी आय प्रशिक्षण ही मोठी संधी आहे मानवत आय टी आय संस्थेत व परभणी या जिल्हा संस्थेत विवीध कंपन्याचे प्रतिनिधी कँम्पस व्दारे आय टी आय च्या सर्वच ट्रेड च्या उमेदवारांची भरती प्रक्रीया प्रत्येक वर्षी राबववत असते
हुषार व गुणवत्ता धारक प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या ऊमेदवांराना तर परदेशात जपान , इस्त्राईल अशा मोठ्या देशात देखील मोठी मागणी आहे २५ ते २९ लाख पर्यंत चे पॅकेज ही आय टी आय ऊमेदवारांनी गुणवत्तेच्या जोरावर प्राप्त केलेली आहेत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी कौशल्य विकास योजनेवर विशेष लक्ष दिले असून ऊच्च शिक्षीत व प्रशिक्षीत शिक्षक निदेशक वृंद संस्थेत ऊपलब्ध करून दिला असून मानवत आय टी आय संस्थेत एकुण ९ प्रशिक्षक ऊपलब्ध झाले असून BE / ME मेकॅनिकल व इलेक्ट्रीकल ऊच्च शिक्षीत व अनुभवी शिक्षक वृंद ऊपलब्ध झाल्या मूळे आय टी आय प्रशिक्षणाचा दर्जा ऊंचावण्यास निश्चीतच फायदा होणार आहे मानवत आय टी आय संस्थेत दररोज ११ ते ५ वाजे पर्यंत विनामुल्य मार्गदर्शन साठी
सोमवार ते बुधवार निदेशक श्री परमेश्वर गीरी व गुरुस्थळे तर गुरुवार ते शनीवार श्रीमती दिक्षा कोर ‘
अशविणी नाटकर व खैरनार मॅडम यांची नियुक्ती केलेली आहे
सर्व गरीब व होतकरु १० वी उत्तीर्ण ऊमेदवारांनी तात्काळ ऑनलाईन अर्ज भरावेत व पसंती नुसार व्यवसाय निश्चिती ऑपशन भरावेत
असे आवाहान मानवत संस्थेचे प्रभारी प्राचार्य चंद्रशेखर देशपांडे व गट निदेशक श्री कल्यान पटेकर यांनी केले आहे.

*

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.