https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मार्गदर्शक उपलब्ध करून द्या अन्यथा आत्महत्यातेस परवानगी द्या ,विद्यार्थ्यांची कुलगुरूकडे मागणी

नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील विद्यार्थी राज्यपाल गुणाजी गायकवाड यांनी कुलगुरू महोदयाकडे मला पीएचडीसाठी मार्गदर्शक उपलब्ध करून द्या अन्यथा आत्महत्या परवानगी द्या अशा स्वरूपात आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे निवेदन दिले आहे. राज्यपाल गुणाजी गायकवाड हा विद्यार्थी जर्नालिझम अँड मासकम्युनिकेशन या विषयाचा असून त्याने निवेदनात असे म्हटले आहे की 2018 पासून मी पी. एचडी चा मार्गदर्शक मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहे त्यासाठी मी अनेक वेळा कुलगुरूंना सुद्धा भेटलो पण माझ्या भेटण्याचा किंवा अर्ज करण्याचा कुठेच विचार झाला नाही. या विद्यार्थ्याने असा आरोप केला आहे की 2023 मध्ये झालेल्या आरएसी मध्ये सामाजिक आरक्षणानुसार विद्यार्थ्याला गाईड उपलब्ध झाले नाहीत त्यामध्ये काहीतरी खाली वरी झाले त्यामुळे ‌ माझ्यावर अन्याय झाला असून विद्यार्थ्यांना गाईड कशाप्रकारे उपलब्ध झाले याची माहिती मला आहे असा आरोप यामध्ये करण्यात आला आहे तेव्हा कुलगुरू साहेबांनी माझे शैक्षणिक हित लक्षात घेऊन मला आपल्या विशेष अधिकारातून मार्गदर्शक उपलब्ध करून द्यावा जर आपण मला मार्गदर्शक उपलब्ध करून देण्यास असमर्थन असाल तर मला आत्महत्येस परवानगी द्यावी. विद्यार्थ्यांनी असा विश्वास दाखवला आहे की मी शंभर टक्के आत्महत्या करतो आणि याबद्दल कुलगुरू स्वतः जबाबदार राहतील. या अगोदर मी मार्गदर्शक मिळवण्यासाठी डीन मध्यम शास्त्र विभागाचे डायरेक्टर उपकुलसचिव कुलकर्णी सर यांना देखील भेटलो माझ्यावर वेळोवेळी अन्याय होत आहे.

हा शेवटचा अर्ज असून त्याबद्दल तुम्ही काही विचार केला नाही तर मी नक्कीच शंभर टक्के आत्महत्या करणार असे निवेदनात म्हटले आहे

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704