https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

धार्मिक व सांस्कृतिक दहशतवाद्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे भीमशक्ती सामाजिक संघटना यांच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आले..

नांदेड:धार्मिक व सांस्कृतिक दहशतवाद्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे भीमशक्ती सामाजिक संघटना यांच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आले..
सविस्तर वृत्त असे की राष्ट्रपुरुषांच्या अवमान करणाऱ्या संभाजी भिडे यास राष्ट्रद्रोहच्या गुन्ह्याखाली अटक करण्याबाबत दिनांक २/८/२०२३ रोजी भीमशक्ती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने राज्यभर आंदोलन पुकारण्यात आले असून त्याच अनुषंगाने संभाजी भिडे याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपात निदर्शने करण्यात आली आहेत संघ पुरस्कृत विचारसरणी देशभरात धार्मिक व जातीय तेढ निर्माण करून सनातनाच्या विळख्यात जातीय व्यवस्था बळकटीसाठी विविध कटकारस्थान करणारा संभाजी भिडे यांच्यावर
राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा यासाठी आज दिनांक २/८/२०२३ रोजी नांदेड जिल्ह्यातील भीमशक्तीचे सर्व पदाधिकारी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात तीव्र निदर्शने केली आहेत भीमा कोरेगाव दंगलीचा सूत्रधार मागासवर्गीय यांच्या हजारो कार्यकर्ते यांच्यावरील दाखल गुन्हेचा जन्मदाता संभाजी भिडे व महापुरुषांच्या विटंबना करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा ही प्रमुख मागणी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे
चंद्रकांत भोकरे
जिल्हाध्यक्ष उत्तर , शत्रुघ्न वाघमारे जिल्हाध्यक्ष दक्षिण , युवक जिल्हाध्यक्ष सुरेश हटकर, शहराध्यक्ष संजय कवठेकर, सुखदेव भिसे नांदेड तालुकाध्यक्ष ,प्रकाश गव्हाणे जिल्हा उपाध्यक्ष, राजपाल गच्चे जिल्हा संघटक, इंजि. प्रदीप भोकरे, संतोष भद्रे युवा उपाध्यक्ष, मिलिंद लोकरे शहर उपाध्यक्ष, अरविंद हटकर भीमशक्ती युवा नेते, शिवराज गायकवाड धर्माबाद तालुकाध्यक्ष, गंगाधर सोनकांबळे बिलोली तालुकाध्यक्ष ,आकाश कांबळे मुखेड तालुका अध्यक्ष, साहेबराव लोखंडे अर्धापूर तालुकाध्यक्ष,
सुमनताई निखाते महिला आघाडी अध्यक्ष, मीनाक्षीताई शिंदे नांदेड शहराध्यक्ष, मीनाक्षीताई धनकर संघटक नांदेड जिल्हा आणि इतर कार्यकारिणीतील पदाधिकारी उपस्थित होते

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704