नगर परिषदेच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास फौजदारी गून्हे दाखल करणार:मुख्याधिकारी, श्रीमती कोमल सावरे.

मानवत // प्रतिनिधी.
मानवत शहर व नगर परिषद हि जिल्हात प्रसिध्द असून विकासामूळे मराठवाड्यात नंबर १ वर आहे. शहरात विविध विकास कामे व शहर स्वच्छते कडे अधिक लक्ष मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांचे असल्यामूळे आज शहर स्वच्छ व सुंदर आणि विकासन शिल याकडे अग्रक्रम करीत आहे.
नगर परिषदेने आपल्या उत्पनात भर पडावी व विकासाला निधी उपलब्ध व्हावा म्हणून अनेक उपक्रम प्रशासन स्तरावर राबविण्यात येत आहेत. गेल्या अनेक दशकाची थकबाकीची परंपरा मोडीत काढत सक्तीने वसूली करून प्रशासन चालविण्यासाठी अर्थीक कडक वसूली मोहिम राबविण्यात आली. तर शहरातील मोक्याच्या जागेवर परवानगी शिवाय बॅनर पोस्टर लावण्यास मज्जाव करण्यात आल्यामूळे जाहिरात बॅनर साठी न.पा. प्रशासनाला कर भरावा लागला त्यामूळे नगर परिषदेच्या ऊत्पन्नात भर पडली बे कायदा विणा परवानगीचे बॅनर शहरात लागले तर दंडात्मक व फौजदारीचे आदेश दिल्याने अनेकांचे धाबे दणाणले.
.