देवलगाव आवचार येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक, कूळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त सर्व रोग निदान शिबिर संपन्न

मानवत // प्रतिनिधी.
————————————
मोफत भव्य सर्व रोग निदान आरोग्य तपासणी व मोफत मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिर दिनांक 06 मार्च रोजी मानवत तालूक्यातील मौजे देवलगाव अवचार येथे कूळवाडी भूषण बहूजन प्रतिपालक, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सवा निमित्त परभणी जिल्हाचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री ना. सौ मेघना दिदी बोर्डीकर व आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र प्रमुख श्री डॉ.ओमप्रकाशजी शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी मानवत तालुका अध्यक्ष विकास मगर व शिवसामर्थ्य सोशल फाउंडेशन संचालक पांडुरंग नखाते, महेश कावळे यांच्या वतीने मोफत भव्य रोग निदान शिबिर व मोतीबिंदू तपासणी व मोफत मोती बिंदू शस्त्रक्रिया, शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये 274 रुग्णांची तपासणी करण्यात आली. तर त्यापैकी *29* रुग्ण मोती बिंदू आढळून आले त्यांची सर्वांची शस्त्रक्रिया मुंबई येथे शिव सामर्थ्य फाउंडेशन यांच्या वतीने मोफत करण्यात येणार आहे.
यावेळी उपस्थित, पांडुरंग नखाते, डॉ राम जाधव,मधुकरराव आवचार, केशवराव आवचार,विकास मगर, कृष्णा जाधव,जनार्धन आवचार, शेषराव आवचार ,ओंमकार पान्हेरे, महेश कावळे, आशाताई यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले