यशवंत ‘मध्ये भारतीय विचारवंत व क्रांतिकारकांवर भित्तीपत्रक प्रदर्शन सोहळा संपन्न

नांदेड:(दि.२ सप्टेंबर २०२२)
भारतीय स्वातंत्र्यांचे अमृत महोत्सवी वर्ष आणि यशवंत महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त राज्यशास्त्र विभागातर्फे भारतीय विचारवंत व क्रांतिकारकांवर भित्तिपत्रक प्रदर्शन सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या प्रदर्शनाचे उद्घाटक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी उद्घाटन प्रसंगी, महापुरुषांचे विचार व कार्याचा अभ्यास करून आपल्या व राष्ट्राच्या जीवनातील प्रश्न सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नरत रहावे; असे मनोगत व्यक्त केले.
विविध विषयांवर आयोजित भित्तिपत्रकांमध्ये नागेश थोरात, विशाल उबाळे आणि कुणाल आढाव यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस, सिद्धार्थ ढवळे, शुभांगी पासलेवाड आणि विद्या कदम यांनी महात्मा फुले, अर्जुन खिल्लारे यांनी महात्मा गांधी, प्रगती तेलंग यांनी सरोजिनी नायडू, पवन सावळे, सचिन गमेवाड आणि अंकुश मगरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, योगिता शिंदे, कल्याणी जाधव आणि वैष्णवी राजेगोरे यांनी महात्मा गांधी, पूजा तोंडेवाड आणि मीनाक्षी कोकाटे यांनी आचार्य चाणक्य, आशा खानसोळे आणि वर्षा बोंद्रे यांनी पंडित नेहरू, विशाल कांबळे, सचिन सरोदे आणि आकाश बुक्तरे यांनी राजा राममोहन रॉय, अंजली गायकवाड, राजश्री नांदेडकर आणि शीतल दुधम्बे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, जान्हवी सोरगे हिने लोकमान्य टिळक, गायत्री सोलंकी आणि किरण गादेवार यांनी शहीद भगतसिंग, साक्षी गोदरे, प्राची गज्जेवार आणि मधु कदम यांनी महात्मा गांधी, प्रियंका मोटरगे आणि लिला वाईकर यांनी पंडित नेहरू, वैष्णवी कडेकर हिने सावित्रीबाई फुले यांचे जीवन, विचार व कार्यावर भितीपत्रकाद्वारे प्रकाश टाकला.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी डॉ.अजय गव्हाणे, डॉ.कविता सोनकांबळे, डॉ.वीरभद्र स्वामी, डॉ. मंजुश्री देशमुख, संदीप पाटील, कालिदास बिरादार, गजानन पाटील, विनायक मळगे, रंगनाथ जाधव, जगदीश उमरीकर आदींनी सहकार्य केले.
—