https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

उक्कलगाव येथे बोअरवेल मध्ये पडलेल्या चार वर्षीय बालकाचे वाचविले प्राण ; प्रशासनाने केलेल्या प्रयत्नाना यश प्राप्त.

मानवत / प्रतिनिधी.
मानवत तालुक्यातील मौ. उक्कलगाव येथील बालक सोहम उर्फ गोलू सुरेश उक्कलकर हा चार वर्षीय मुलगा शेतातील बोरवेल मध्ये पडल्याची घटना घडली आहे. सोहम उर्फ गोलू हा आजी आजोबा सोबत शेतात गेला होता. जवळच पडीत असलेल्या अवस्थेत बोअरवेल होता गोलू हा खेळत खेळत त्या ठिकाणी गेला व त्या बोअरवेल मध्ये पडला व २० फूट अंतराव अडकला असल्याचे माहिती मिळताच या ठिकाणी अग्निशमन दल व वैद्यकीय अधिकारी यांच्या सह उप विभागीय पोलीस अधिकारी ओहळ, उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, मानवत तहसीलदार पल्लवी टेमकर, पोलीस निरीक्षक दिपक दंतूलवार मंडळ अधिकारी यांच्या सह प्रसासनाचे अधिकारी दाखल झाले असून या ठिकाणी तीन जेसीबी च्या सहाय्याने खोद काम सरू असून बचाव कार्य युध्द पातळीवर सुरु असल्याची माहिती मिळत आहे. सदरील घटना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली असून चार ते पाच झाले आहे बचाव कार्य युद्धपातळी प्रयत्न करून बाळाचे प्राण वाचविल्याने उक्कलगावकरांनी केली फटाक्याची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704