https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

यशवंत ‘ मधील वाणिज्य विभागात विविध विद्यार्थी अभ्यास मंडळांचे उदघाटन

नांदेड:(दि.२५ ऑगस्ट २०२३)
यशवंत महाविद्यालयातील वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील विविध विद्यार्थी अभ्यास मंडळाचे उद्घाटन पीपल्स महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सचिन पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे होते.
प्रारंभी प्रास्ताविक उपप्राचार्य व वाणिज्य विभागप्रमुख तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे प्रभारी सहयोगी अधिष्ठाता प्रा.डॉ.हरिश्चंद्र पतंगे यांनी केले.
उद्घाटनपर भाषणात उपप्राचार्य डॉ.सचिन पवार यांनी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील विद्यार्थ्यांनी ज्ञानाबरोबरच कौशल्य आत्मसात केले पाहिजे; ज्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात संधी प्राप्त करता येतात.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, सर्व विद्यार्थ्यांचे व विविध अभ्यास मंडळांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून भविष्यात वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील विद्यार्थ्यांना भरपूर संधी प्राप्त व्हाव्यात;यासाठी शुभेच्छा दिल्या.
वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखेतील सर्वांना संधी देऊन् त्यांच्या सर्वांगीण विकास झाला पाहिजे या हेतूने श्रद्धेय डॉ. शंकररावजी चव्हाण जन्मशताब्दी(२०१९-२०) वर्षापासून एका अभ्यास मंडळाऐवजी चार विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना केली जाते. जसे वाणिज्य अभ्यास मंडळ, व्यवस्थापन अभ्यास मंडळ,अधिकोष अभ्यास मंडळ व कर अभ्यास मंडळ.
या सर्व अभ्यास मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची निवड ही वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येते.या सर्व अभ्यास मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव आणि कोषाध्यक्ष हे सर्वजण मार्गदर्शक प्राध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धांचे व कार्यक्रमांचे नियोजन व आयोजन करतात.
याप्रसंगी प्रा.डॉ.मोहम्मद आमेर, डॉ.आर्.एल.सोनटक्के,प्रा.भारती सुवर्णकार,प्रा.सोनाली वाकोडे, प्रा.प्रियंका सिसोदिया,डॉ.बालाजी तुरइकर, प्रा.व्ही. एस.राठोड यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानव जामकर व वैभव बरगळे यांनी केले तर आभार गौरी माटे हिने मानले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704