https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

सकल मराठा समाजाचा वतीने मानवत शहर १०० % कडकडीत बं

मानवत / प्रतिनिधी.

सगे सोयरे अधिसुचनेचे रूपांतर कायद्यात करुन मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासाठी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे हे १० फेब्रुवारी पासून अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसले असून त्यांची प्रकृती अधिक चिंताजनक असून ती खालावत चालली आहे. त्यामुळे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने त्यांना पाठिंबा म्हणून १४ फेब्रुवारी रोजी मानवत शहर बंदची हाक देण्यात आली.
आज मानवत शहरात सकाळपासून व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठापणे बंद ठेवून बंद पाळत १०० % प्रतिसाद दिला.
मराठा समाजाला कुणबी मधून आरक्षण देऊन सगे सोयरेचा अधिसूचने बाबत विशेष अधिवेशनात मुद्दा मांडून त्याचे रूपांतर कायद्यात करुन मराठा समाजाला आरक्षण द्यावे त्यांच्या समर्थनार्थ पाठिंबा म्हणून मानवत येथील सकल मराठा समाज बांधवानी मानवत शहर बंदची हाक दिली असता व्यापाऱ्यांनी ही बंदला १०० % प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने बुधवारी बंद ठेवत बंद मध्ये सहभागी झाले.
बंद दरम्यान अत्यावश्यक सेवा, दवाखाना, पेट्रोल पंप, शाळा, सेवा वगळता पूर्ण शहरातील प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704