https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ‘यशवंत ‘ चे सुयश

नांदेड: (दि.२० नोव्हेंबर २०२३)
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील प्रा.ओमप्रकाश गुंजकर व प्रा.डॉ.अजय गव्हाणे यांना नाशिक येथे दि.१७ व १८ नोव्हेंबरला संपन्न झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत एकूण दोन सुवर्ण व तीन रौप्य पदक प्राप्त होऊन सुयश प्राप्त झाले आहे.
कनिष्ठ महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाचे प्रा.ओमप्रकाश नागनाथराव गुंजकर यांना ५० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये सुवर्णपदक, शंभर मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य पदक आणि ५० मीटर फ्रीस्टाइलमध्ये रौप्य पदक प्राप्त झाले आहे. वरिष्ठ महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय वसंतराव गव्हाणे यांना शंभर मीटर बटरफ्लायमध्ये सुवर्णपदक व ५० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य पदक प्राप्त झाले आहे. या दोन्हीही जलतरणपटूंची फेब्रुवारी:२०२४ मध्ये आयोजित गोवा येथील राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या सुयशाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र- कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन यथोचित गौरव व सन्मान केला.
यशस्वितांचे उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.कबीर रबडे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ.एल.व्ही पदमाराणी राव,कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, कार्यालयीन अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, डॉ.मीरा फड, डॉ.संगीता भुसारे, डॉ.शिवराज बोकडे, डॉ. वीरभद्र स्वामी, डॉ.धनराज भुरे, क्रीडा संचालक डॉ.मनोज पैंजणे, डॉ.विजय भोसले, डॉ.प्रवीण तामसेकर, डॉ. साईनाथ शाहू, प्रा.उत्तम केंद्रे, डॉ.एकनाथ मिरकुटे, डॉ.भास्कर देशमुख, प्रा.नरेंद्र कंचटवार, प्रा.सचिन अपस्तंभ, डॉ.श्रीरंग बोडके, जगदीश उमरीकर, श्री.डाकोरे, शिवाजीराव भोसले,श्री.तेलंग आदींनी अभिनंदन केले आहे.
———–

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704