https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

यशवंत महाविद्यालयात हिंदी पंधरवड्याचे उद्घाटन

नांदेड:(दि.१५ सप्टेंबर २०२३)
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या वतीने आयोजित हिंदी पंधरवड्याचे उद्घाटन श्री. शिवाजी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, रिठद, जि.वाशिम येथील प्रसिद्ध हिंदी मराठी साहित्यकार श्री. धीरज पावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे माजी प्र-कुलगुरू व यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांचे मार्गदर्शन व प्रेरणेतून हिंदी दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदी विभागप्रमुख डॉ.संदीप पाईकराव होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस हिंदी दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे व साहित्य परिषदेचे उद्घाटन प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे व प्रमुख पाहुणे श्री धीरज पावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी बोलताना श्री. धीरज पावडे म्हणाले की, हिंदी भाषेने रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध केल्या असून केवळ देशातच नव्हे तर विदेशातील अनेक प्रांतांमध्ये भारतीय तरुणांना हिंदी भाषेने रोजगार मिळवून दिला. साहित्याच्या दृष्टीने ही भाषा जागतिक स्तरावर पोहोचली असून जागतिक स्तरावर अनेक साहित्यिक लिखाणासाठी या भाषेचा वापर करीत आहेत. त्यामुळे हिंदी केवळ राष्ट्राची भाषा राहिली नसून ती रोजगार व साहित्याच्या दृष्टीने जागतिक भाषा होत आहे, असे महत्त्वपूर्ण विधान या कार्यक्रमादरम्यान त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ.संदीप पाईकराव यांनी, यशवंत महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या वतीने दरवर्षी हिंदी पंधरवड्याचे आयोजन करून विद्यार्थ्यांची अंगीक व भाषिक कौशल्य विकसित करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातो,अशी माहिती देत विद्यार्थ्यांसाठी काव्यवाचन, रांगोळी, निबंध, वक्तृत्व यासारख्या स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत कु.तुलसीच्या स्वागत गीताने स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी स्वलिखित काव्यवाचन व तसेच आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संयोजक डॉ.सुनील जाधव यांनी केले तसेच सूत्रसंचालन कु. निकिता, कु. प्रणिता आणि आभार कु. राधिका देशमुख यांनी मानले.
कार्यक्रमास प्राध्यापक, प्रबंधक श्री.संदीप पाटील, कार्यालयीन अधीक्षक श्री.कालिदास बिरादार व श्री.गजानन पाटील आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी हिंदी विभागाचे डॉ.सुनील जाधव, डॉ.साईनाथ शाहू, डॉ.विद्या सावते व श्री. प्रशांत मुंगल यांनी परिश्रम घेतले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704