यशवंत ‘मध्ये राज्यशास्त्र विभागातर्फे व्याख्यानाचे आयोजन
नांदेड:(दि.४ ऑगस्ट २०२३)
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागातर्फे इंडक्शन प्रोग्रामअंतर्गत ‘राज्यशास्त्रातील करियर आणि संधी’ या विषयावर लोकमान्य महाविद्यालय, सोनखेड येथील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.आर.डी.शिंदे यांच्या व्याख्यानाचे आयोजन दि.५ ऑगस्ट २०२३, शनिवार रोजी सकाळी ठीक १० वाजता मानव्यविज्ञान विद्याशाखा,आयसीटी हॉलमध्ये करण्यात आलेले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे भूषविणार आहेत.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
तरी या व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. अजय गव्हाणे, डॉ.वीरभद्र स्वामी, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, कार्यालयीन अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील आदींनी केले आहे.
—-