https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

पशूधन विक्री बाजाराच्या परिसरात अतिक्रमण होऊ देणार नाही.: डाॅ. अकूंशराव लाड.

मानवत प्रतिनिधी:
माझ्या मानवत शहरात अतिक्रमण होऊ देणार नाही! उलट त्या जागी मानवत नगर परिषदेच्या माध्यमातून व्यापारी संकूलाची वास्तू उभारून नागरिकांसाठी उपयोगी वास्तू संकूल निर्माण करणार डाॅ. अकूंशराव लाड यांची ग्वाही.
सविस्तर वृत्त असे की,
गेल्या पंचेविस वर्षा पासून पशूधन खरेदी विक्री बाजार भरविण्याची प्रक्रिया बंद होती पण सर्वांच्या सहकार्‍यांनी पून्हा पशुधन खरेदी विक्रीचा बाजार सूरू करण्यात आला असून मानवत नगर परिषदेला त्या पासून अर्थिक ऊत्पन्न मिळत आहे. भविष्यात उत्पन्नात वाढ होऊन पशुधन खरेदी विक्री हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात प्रगती करेल व मराठवाड्यात प्रसिध्दी पावेल यासाठीच मानवत नगर परिषदेने मानवत शहराला पून्हा वैभव प्राप्त होईल म्हणून अद्यावत संकूल उभारणीचा संकल्प घेतला असून मात्र शहरातील काही भू माफिया मात्र नगर परिषदेच्या मालकी असलेल्या पाळोदी रोडवरील आठवडी बाजार परिसरातील मोकळ्या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करीत असल्याने त्यांचे मनसूबे उधळून लावले आहे. या परिसरात होऊ घातलेल्या अतिक्रमनावर हातोडा घातला.
त्या मूळे मोठा अनर्थ टळला.
अतिक्रमण होत असल्याचे माझ्या नजरेस पडताच मी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधून वेळीच हे काम पूर्णपणे रोखले व अतिक्रमणधारकांना सावधान केले. या वेळी पोलीस निरीक्षक, मानवत नगर परिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासनाने जातीने उपस्थित राहून सहकार्य केल्याबद्दल आभार. मानवत शहरात पुढील काळात याठिकाणी व्यापारी संकुल निर्माण करण्याचा सुजान नागरिक म्हणून माझा निर्धार आहे. शहराची प्रगती करायची असेल तर विविध विकासाचे उद्योग , या साठी उपक्रम राबवावे लागतील तरच मानवत शहराला गतवैभव प्राप्त करून देता येईल.
या परिसरावर अनेक भू माफियांचा डोळा असून या पूढे त्यांनी प्रयत्न केले तर ते हाणून पाडले जातील या परिसरात कोणीही अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करू नये असा ईशारा डाॅ. अकूंशराव लाड यांनी प्रशासना समोर भूमाफियांना दिला.

 

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704