खताचा काळाबाजार थांबवून लिंकिंग खत विक्री बंद करण्याची मागणी
मानवतचे नायब तहसीलदार नकुल वाघुंडे यांच्या कडे मागण्याचे निवेदन सादर

मानवत / प्रतिनिधी.
खताचा काळाबाजार थांबवून लिंकिंग खत विक्री बंद करावी अशी मागणी मानवत तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार नकुल वाघुंडे यांच्याकडे दिनांक २४ जून रोजी एका निवेदना द्वारे करण्यात आली असून दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे कि, मानवत तालुक्यातील शेतकऱ्यांना १०:२६:२६ व डी. ए. पी खत मिळत नाही. परंतु काही दुकानदार लिंकिंग पद्धतीने विक्री करत आहेत १०:२६: २६ या खाताचा बॅग सोबत नॅनो बॉटल एक खरेदी करा नाही तर आमच्याकडे खत उपलब्ध नाही असे म्हणत आहेत व शेतकऱ्याला सक्ती करून वेठीस धरत आहेत. जे दुकानदार शेतकऱ्यांना सक्ती करत आहेत त्यांचा परवाना रद्द करण्यात यावा व तालुक्यातील होणा ऱ्या काळ्या बाजारातील खताची विक्री याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी व संबंधित तालुका कृषि अधि कारी व पंचायत समिती कृषी अधि कारी या कडे दुर्लक्ष करत असून फोन ही उचलत नाहीत यामुळे यामुळे २७ जून रोजी मानवत कृषी कार्यालयास ताळे ठोक आंदोलन करण्यात येणार असल्याचे ही निवेदना त म्हटले असून निवेदनावर कॉ. रामराजे महाडिक, हनुमान मसलकर, विठ्ठल चौखट, हनुमान तारे, नारायण आवचार, माऊली निर्वळ, विष्णू जाधव यांच्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
***