यशवंत महाविद्यालयात बी.ए. अभ्यासक्रमासाठी मानसशास्त्र या विषयास मान्यता

नांदेड:( दि.१९ जून २०२५)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष: २०२५- २६ पासून उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने दि. १४ जून २०२५ रोजी प्रकाशित शासन निर्णयानुसार बी.ए. अभ्यासक्रमांतर्गत मानसशास्त्र या विषयास मान्यता प्राप्त झाली आहे.
मानसशास्त्र हा विषय आधुनिक काळात विविध क्षेत्रात महत्वपूर्ण असून समुपदेशन, आरोग्यसेवा व संशोधन क्षेत्रात याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. विविध खाजगी आस्थापनांमध्ये समुपदेशक, कौटुंबिक समुपदेशक, न्यायालय, दक्षता समिती, पोलीस प्रशासन, तुरुंग व्यवस्थापन, औद्योगिक संस्थांमध्ये देखील संधी आहे. मानसशास्त्रामध्ये पदवी, पदव्युत्तर, डॉक्टरेट व डिप्लोमा करून शासकीय व खाजगी संस्थांमध्ये नोकरीला भरपूर वाव आहे.
तरी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी बी.ए. प्रथम वर्षात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश घेताना मानसशास्त्र हा विषय घ्यावा, असे आवाहन माजी प्र- कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, मानवविज्ञानविद्याशाखा प्रवेश प्रक्रिया प्रमुख उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील आणि अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील यांनी केले आहे.