खंडोबा रोड परिसरात विविध विकासकामांचे डाॅ. अकूंराव लाड यांच्या हस्ते उद्घाटन

मानवत /प्रतिनिधी
—————————
शहरातील प्रभाग क्रमांक २ मध्ये समाविष्ट असणारा खंडोबा टेकडी व खंडोबा रोड हा परिसर अत्यंत गजबजलेला व जुने मानवत म्हणून ओळख असलेला आहे. या परिसरात गेल्या काही दिवसापासून कमी दाबाचा विद्युत पुरवठा व कमी दाबाचा पाणीपुरवठा तसेच गल्लीतील अंतर्गत रस्ते व अंतर्गत नाली हे प्रश्न प्रलंबित होते. या सर्व प्रश्नांची सोडवणूक करत विविध कामाचे उद्घाटन मानवत शहराचे युवा नेते डॉ. अंकुश लाड यांच्या हस्ते १९ मे रोजी सकाळी १०.३० सुमारास पार पडले.
प्रभाग क्रमांक २ मधील शेकडो नागरिक व मान्यवरांच्या उपस्थितीत खंडोबा रोड परिसरात विविध विकासकामांचे उद्घाटन व कामाचा शुभारंभ डॉ अंकुश लाड यांचे हस्ते पार पडला. ज्यामध्ये रस्ता, नाली, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तसेच लाईट पोल कामाची सुरुवात झाली. अनेक दिवसांपासून स्थानिकांची याकरिता मागणी होती, शासन दरबारी पाठपुरावा करून निधी मंजूर करून आणला व प्रत्यक्षात कामाचा श्रीगणेशा केला. याबद्दल उपस्थित सर्व नागरिकांनी डॉ.अंकुश लाड यांचा सत्कार करत काम शुभारंभ बद्दल कृतज्ञता व्यक्त केली .
मानवत शहरातील बहुतांश वसाहतीमध्ये विविध प्रकारचे विकास कामे यापूर्वीच युवानेते डॉक्टर अंकुश लाड यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहेत. परंतु काही ठिकाणी तांत्रिक अडचणी व निधीच उपलब्धता या कारणाने कामे प्रलंबित होती. ज्या प्रमाणात कामांसाठी निधी उपलब्धता झाली त्याचप्रमाणे तात्काळ डॉ.अंकुश लाड त्यांच्या नेतृत्वात या कामाला सुरुवात करण्यात येते.
या वेळी प्रभाग क्रमांक 2 चे मा. नगरसेवक आनंदमामा भदर्गे, अभिषेक आळसपुरे, नारायणराव धबडगे, सत्यशील धबडगे, राहुल भदर्गे, गणेशसेठ कुमावत, दत्तराव चौधरी, गणेशराव मोरे, श्रीधर कोक्कर, नांदुभाऊ कच्छवे, गणेशराव दहे, करीम लाला कुरेशी, रशीद कुरेशी, हारून कुरेशी, शेख चांद, शेख सलीम, अल्ताफ कुरेशी, मुश्ताक कुरेशी, शकील कुरेशी, फारूक कुरेशी, खय्युमभाई बागवान, साजन टेलर, मेहबूबभाई मन्सूरी, समीर सय्यद, हसन शेख, मुजीब कुरेशी, शेख मन्नू, शेख कलीम, मोहसीन शेख, शेख लालू, मतीन काझी, अनिस कुरेशी, नासिर राज, अशीर राज, रियाज कुरेशी, नदीम कुरेशी, इलाही कुरेशी, पपू गायकवाड, विशाल धापसे, अभिमानराव धबडगे, लहू मामा, रवी वाघमारे, हरिभाऊ चटाले, अनिल घाटुळ उपस्थित होते.
डॉ लाड यांचे काम निवडणूक डोळ्यासमोर ठेवून न करता सामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून असते.
अधिकतर लोकप्रतिनिधी हे त्यांचे कार्य निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करत असतात परंतु मानवत शहराचे युवा नेते डॉ.अंकुश लाड हे त्यांचे कामे कधीच निवडणुका समोर ठेवून करत नाही ते सामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून सातत्याने २४ तास उपलब्ध असतात व त्यांचे कार्य हे केवळ जनसेवेचेच असते अशी प्रतिक्रिया प्रभाग क्रमांक दोन मधील ज्येष्ठ नागरिक नारायणराव धबडगे यांनी या कार्यक्रम प्रसंगी दिली.
***