राष्ट्रिय चर्मकार महासंघाकडून शोभायात्रा मिरवणूकीतील नागरिकांना शितलजल व अल्पोहाराचे वाटप.

मानवत / प्रतिनिधी.
—————————————
विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त राष्ट्रिय चर्मकार महासंघाच्यावतीने शितल जलदान व अल्पोहाराचे वाटप करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की,
आज मानवत शहरात भारतरत्न, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेतील मिरवणूकी मधील सहभागी झालेल्या नागरिकांना
राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आज भीमजयंती उत्सव सोहळ्यातील शितलजल व अल्पोहार स्टॉलचे उदघाटन मानवत नगरीचे विकास पुरुष डॉ अंकुशराव लाड, मानवत पोलीस स्टेशन चे पीएसआय संदिप बोरकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी शहरातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रिय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष मुरली ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाले व पुढाकाराने व राष्ट्रिय चर्मकार समाज बांधवांच्या सहकार्याने शितलजल व अल्पोहार वाटप करण्यात आले. हाजारो नागरिकांनी कार्यक्रमात सहभागी होऊन शितलजल व अल्पोहाराचा लाभ घेतला या वेळी राबविण्यात आलेल्या सामाजीक उपक्रमा बद्दल यावेळी सर्वांनी शुभेच्छा दिल्या
***