ताज्या घडामोडी

बारहाते गल्लीतील मिरगीन जलकूंभ परिसराच्या सुशोभीकरण कामाचे डाॅ. अकूंशराव लाड यांच्या हस्ते शुभारंभ

मानवत / प्रतिनिधी.
मानवत शहरातील बारहात्ते गल्ली व मिरगीन जलकूंभ ( टाकी ) परिसराचे सुशोभिकरण कामाचे आज डाॅ. अकूंशराव लाड यांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
गेल्या अनेक महिण्यापासून या परिसरातील नागरिकांची बऱ्याच दिवसांपासूनची मागणी आज पूर्ण झाली. तर मोकळ्या जागेच्या ठिकाणी मजबूत सुरक्षा भिंत, लहान मुलांसाठी खेळणी ज्येष्ठ नागरिकां साठी वॉकिंग ट्रॅक, बसण्याची उत्तम व्यवस्था याठिकाणी करण्यात येणार आहे. यापूर्वी या परिसरात घाणीचे साम्राज्य होते. मोकाट जनावरे, अस्वच्छता, अंधारामुळे नागरिक त्रस्त होते. म्हणूनच या ठिकाणी गार्डन व कंपाउंड वॉल व्हावी अशी या भागातील नागरिकांची मागणी होती. या कामाचे उद्घाटन करताना आनंद होत असल्याचे मत डाॅ. अकूंशराव लाड यांनी या वेळी व्यक्त केले आहे.
कार्यक्रमास मा. नगरसेवक गणेश कुमावत, विनोद रहाटे, शिवाजीराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे पाटील, ज्येष्ठ विधीज्ञ अनिरुद्ध पांडे सर, माजी नगरसेवक दत्ता चौधरी, मोहन लाड, ज्येष्ठ पत्रकार मोहनराव बारहाते, पत्रकार विलास भाऊ बारहाते, पप्पू भैया बारहाते, अशोक भाऊ बारहाते, रंगनाथराव बारहाते, श्रीधर कोकर, आजमभाई कुरेशी, रफिक भाई कुरेशी, हारून भाई कुरेशी, शकील भाई कुरेशी, अन्वर भाई बागवान, महबूब मंसूरी, कयूम भाई बागवान, सुभाष लेंगुळे, दगडोबा लेंगुळे, अमोल लेंगुळे, प्रकाश मोगरे, केशव पाटील, बिजू पाटील, गोपाळ दहे, प्रल्हादराव दहे, बालाजी दहे, हनुमान दहे, प्रभाकर दहे, नंदूभाऊ कच्छवे, गणेश दहे, प्रमोद राठोड, प्रदीप पेचफुले, गणेश गाजरे, नरेंद्र कुमावत, शिवनाथ कुमावत, भास्कर कुंभार, राहुल भदर्गे, शंकर तरटे, महादेव पानझाडे, बबन पानझाडे, आकाश गायकवाड, बालाजी गायकवाड, अमोल मेघळ, मोहनसिंग राजपूत, अशोक मगर, बालाजी गिराम आणि अनेक स्थानिक नागरिक उपस्थित होते. या कामामुळे परिसरात स्वच्छता, सुरक्षितता आणि नागरिकांसाठी सुंदर उपयुक्त जागा तयार झाली,

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.