यशवंत वार्षिक युवक महोत्सवात रांगोळी स्पर्धेस भरभरून प्रतिसाद

नांदेड:( दि.११ मार्च २०२५)
श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलीत यशवंत महाविद्यालयात यशवंत वार्षिक युवक महोत्सव:२०२५ मध्ये माजी प्र- कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
रांगोळी स्पर्धा उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्ष उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे होत्या. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे आणि परीक्षक सौ. सुषमा शकरवार, सौ. सुजाता रायलेवार, सौ. सुधा देवशेट्टीवार या होत्या.
स्पर्धेचे उद्घाटन उपप्रचार्य डॉ.कविता सोनकांबळे व प्रमुख पाहुण्यांनी केले. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती यशवंत वार्षिक युवक महोत्सवाचे समन्वयक डॉ. एम. एम. व्ही. बेग यांची होती.
उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा. राजश्री भोपाळे यांनी केले तसेच आभार देखील मानले.
या स्पर्धेला विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी भरभरून प्रतिसाद दिला. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुरेख छायाचित्र स्पर्धकांनी रांगोळीद्वारे चित्रित केले तसेच महिला सक्षमीकरण, महिला हक्क, स्त्रीभ्रूणहत्या, पर्यावरण संरक्षण आदी विषयांवर विद्यार्थ्यांनी रांगोळी चित्रित केली. स्पर्धेमध्ये दोन प्रकारची रांगोळी स्पर्धकांनी काढली.मुक्त हस्ते आणि ठिपक्याची रांगोळी.
याप्रसंगी स्पर्धा समन्वयक डॉ. नीताराणी जैस्वाल, डॉ. मंगल कदम, डॉ. प्रवीणकुमार मिरकुटे, डॉ. अजय गव्हाणे, डॉ. रामराज गावंडे, डॉ.भरत कांबळे, डॉ.अंजली जाधव, डॉ.रत्नमाला मस्के, डॉ.सविता वानखेडे, प्रा.प्रियंका सिसोदिया, प्रा.एस.एस.वाकोडे, डॉ.दीप्ती तोटावार आदींची उपस्थिती होती.
स्पर्धकांनी रांगोळीद्वारे चित्रीत केलेले विषय आणि उत्कृष्टतेचे प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांनी कौतुक केले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, लेखा विभागातील अभय थेटे, के.एस. इंगोले, गोविंद शिंदे, डी.आर. टर्के, एम.आर. कल्याणकर, बी. एल. बेळीकर, नाना शिंदे यांनी परिश्रम घेतले.