ताज्या घडामोडी

राज्याचे उप मुख्यमंत्री ना. एकनाथरावजी शिंदे, यांच्या वाढ दिवसा निमित्त गरजूंना अन्नदान तर रूग्णांना फळ वाटप करून साजरा.

मानवत // प्रतिनिधी.

गोरगरिबांचे कैवारी महाराष्ट्राचे कॉमन मॅन अनाथांचे नाथ, जनतेच्या मनातील मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा एकनाथजी शिंदे , यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज पाथरी विधान सभा मतदार संघात शिवसेनेचे *अल्पसंख्यांक प्रदेश अध्यक्ष सईद भैय्या खान* यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी कार्यक्रम घेऊन मा. उपमूख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी ओंकार वृद्धाश्रम तसेच शासकीय हॉस्पिटल, वरद हॉस्पिटल, या ठिकाणी फळ वाटप व आरोग्य किट वाटप करण्यात आले.
उदंड आयुष्य लाभो या करीता साई जन्मभूमी पाथरी येथे साईबाबांची महाआरती करून मा. उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांना उदंड आयुष्य लाभो यासाठी महाआरती करूण प्रार्थना करण्यात आली.तर पाथरी शहरांमध्ये ठिक ठिकाणी शितल जल पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. तसेच कृषि ऊत्पन्न बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांसाठी मोफत अल्पोहाराची सोय करण्यात आली. विविध कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नाना टाकळकर युवासेनेचे जिल्हाप्रमुख अमोल भालेपाटील, पाथरी विधानसभा प्रमुख एकनाथ उर्फ पप्पू भैया घाडगे, शिव सेना तालुकाप्रमुख विठ्ठल काका रासवे, उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील , विश्वनाथजी थोरे (आन्ना ) युवा सेना लोकसभा प्रमुख विजय नखाते, उपतालुकाप्रमुख नारायण दळवी, उपशहर प्रमुख गजेंद्र टोके, उपशहर प्रमुख मोहसीन खान, रामजी उगले, अनिलजी गालफाडे, बाळासाहेब जिंजान यांच्यासह शिवसेनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेना , युवासेना यांच्या वतीने मा. उपमुख्यमंत्री आ. एकनाथरावजी शिंदे यांचा वाढदिवस पाथरी विधान सभा मतदार संघा मध्ये विविध सामाजीक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.