संध्या लोहकरे हिची विद्यार्थी कल्याण मंडळाच्या सचिव पदी निवड

उदगीर :- येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद अध्यापक महाविद्यालय विद्यार्थी कल्याण मंडळाच्या सचिव पदासाठी नुकतीच निवडणुक घेण्यात आली. या निवड निवडणुकीत सर्व वर्ग प्रतिनिधी यांनी एकमताने बी.एड. प्रथम वर्षात शिकणारी संध्या लोहकरे या विद्यार्थ्यांनीची बिनविरोध निवड करण्यात आली. सदरील निवड प्रक्रिया ही प्राचार्य डॉ. गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या निवड समितीने केली आहे.
या निवडी बद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ.सुधीर जगताप, प्रशासकीय अधिकारी ज्योती स्वामी, विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रभारी प्रा. किरण जगताप, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. मिनाक्षी घोडके, वर्ग प्रतिनिधी अजितकुमार कुंटे, अमृत मुंडकर, महिला प्रतिनिधी श्रेया वट्टमवार, ऋतूजा बिरादार,
निलेश सोनकांबळे, ओमकार बिरादार, प्रगती जाधव, आकाश पाटील, प्रा. डॉ. दुर्गादेवी स्वामी, प्रा. संगीता जाधव, प्रा. वजेसंग मोरी, प्रा. डॉ रोहीदास गाडेकर, प्रा. अभिजीत गिरी, प्रा. महादेव होनकळस,प्रा. विनायक पांढरे, प्रा. गणेश तोरणे, प्रा.महेश दुबाळ,प्रा.डॉ.किरण जगताप, प्रदीप पाटील, सुशांत जाधव, उषा गायकवाड, विठ्ठल कारंजे, रेवती स्वामी, अपर्णा काळे, सुयश स्वामी, सुरेश कारंजे, तुकाराम मुंडे यांनी अभिनंदन केले.