स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ नर्सिंगच्या वार्षिक स्नेह संमेलनाला उत्स्फूर्त सुरुवात

—————————————–
उदगीर :-येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये शै.वर्ष 2024-25 च्या वार्षिक स्नेह संमेलनास उस्फूर्तपणे सुरुवात झाली आहे. सदरील स्नेहसंमेलन हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ.सुधीर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत असून या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेश तोलसरवाड, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या ज्योती तारे, फलोरेंस नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य नागसेन तारे, स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.शेषनारायण जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.अमर तांदळे, पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा.राहुल पुंडगे, क्रिडा शिक्षक संदीप पवार यांच्या उपस्थितीत या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन संपन्न झाले.
हे वार्षिक स्नेह संमेलन 31 जानेवारी ते 07 फेब्रुवारी या दरम्यान चालणार आहे. या स्नेहसंमेलनात कबड्डी, खो- खो, धावण्याची स्पर्धा, चेस स्पर्धा,कॅरम स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, हॉलीबॉल स्पर्धा या खेळा बरोबरच सांस्कृतीक स्पर्धा ज्यात अंताक्षरी, संगीत खुर्ची, गीत गायन, मुक अभिनय, वैयक्तिक नृत्य,समूह नृत्य, मिमिक्री स्पर्धा, समूह गायन, आनंद नगरी, आदी स्पर्धेसह अनेक भरगच्च कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
सदरील क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रिन्सी बी, स्वाती येवडगे, प्रा.संगीता सगर, प्रा. वैष्णवी मोरे, प्रा. दिपाली ठोके, बालाजी कदम, नरसिंग जानके, शकुंतला सोनकांबळे, योगेश काळे हे परिश्रम घेत आहेत.