राष्ट्राच्या विकासासाठी संशोधन आणि नवोपक्रमाची संस्कृती रुजणे गरजेचे* -प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे

*
नांदेड:(दि.१७ जानेवारी २०२५)
यशवंत महाविद्यालयात जैवतंत्रज्ञान विभागाद्वारे पीएम-उषा योजनेअंतर्गत आयोजित व्याख्यानमालेचे यशस्वी उद्घाटन करण्यात आले.
शाश्वत गरजेवर आधारित तांत्रिक नवकल्पनांद्वारे कृषी, औद्योगिक आणि पर्यावरणीय जैवतंत्रज्ञानातील गंभीर आव्हानांना तोंड देणे, हे अतिथी व्याख्यानांचे उद्दिष्ट आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्र- कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे होते तर प्रमुख अतिथी आणि साधन व्यक्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर, उपकॅम्पस धाराशिव येथील येथील जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. जितेंद्र अनंतराव कुलकर्णी होते. याप्रसंगी विचारमंचावर जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. एम.एम.व्ही.बेग उपस्थित होते.
व्याख्यानाचे सूत्रसंचालन डॉ. बी.वाय. गोटीगल्ला यांनी केले.
प्रारंभी प्रास्ताविकात डॉ. एम. एम.व्ही. बेग यांनी अतिथी व्याख्यानमालेच्या उद्दिष्टांची ओळख करून दिली आणि जैवतंत्रज्ञानातील ज्ञानाचा प्रसार आणि नवोपक्रमाला चालना देण्यासाठी पीएम-उषा योजनेचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रमुख वक्ते डॉ. कुलकर्णी यांनी, कृषी क्षेत्रातील आव्हाने, जसे की पीक उत्पादकता वाढवणे आणि हवामानावरील परिणाम कमी करणे तसेच कचरा व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रण यासारख्या औद्योगिक आणि पर्यावरणीय समस्यांना तोंड देण्यासाठी नाविन्यपूर्ण पध्दतीच्या गरजेवर भर दिला.
प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी अध्यक्षीय समारोपात, संयुक्त राष्ट्रांची शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी गरजेवर आधारित तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. राष्ट्रांच्या विकासासाठी आणि जागतिक स्पर्धात्मकतेसाठी विद्यार्थ्यांमध्ये संशोधन आणि नवनिर्मितीची संस्कृती वाढवणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन केले.
शेवटी प्रा. कु. सायली चव्हाण यांनी आभार मानले. याप्रसंगी डॉ.अलकाताई सुर्यवंशी, डॉ.विक्रम पाटील, कु.स्नेहा सुर्यवंशी, कु.शीतल लोखंडे, कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
व्याख्यानाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, डॉ.प्रवीणकुमार मिरकुटे, डॉ. बतुल्ला बालाजीराव, जगन्नाथ महामुने, डॉ.अजय गव्हाणे यांनी सहकार्य केले.