रत्नापूर* जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फूले , राजमाता माॅसाहेब जिजाऊ जन्मोत्सव सोहळा संपन्न.

मानवत / प्रतिनिधी.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रत्नापूर जिल्हा परिषद रत्नापूर शाळेत सावित्री जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात आला दिनांक ३ जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी सुरू झालेला हा महोत्सव शाळेमध्ये विविध उपक्रम राबवून आज त्याची सांगता राष्ट्रमाता राजमाता यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा घेऊन करण्यात आली.
दिनांक 3 जानेवारी ते 12 जानेवारी या कालावधीत भाषण स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, कविता गायन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या.
जन्मोत्सव कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी आज वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक केंद्रप्रमुख मा.ओम मुळे व प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक नेते मा.रमेश मोरे उपस्थित होते. शाळेच्या वतीने पदोन्नतीने केंद्रप्रमुख झाल्याबद्दल मार्गदर्शक मुळे सरांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार शाळेच्या वतीने श्री संग्राम कुमठेकर सर यांनी केला. प्रमुख अतिथी रमेश मोरे सरांचा सत्कार मुख्याध्यापक अशोक सरवदे सरांनी केला. मान्यवर रमेश मोरे यांच्या मार्गदर्शना नंतर बाल वक्त्यांची भाषण स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षण श्रीमती आम्रपाली मोटे मॅडम व श्रीमती स्वप्नाली आवले मॅडम यांनी केले. उपस्थित राहिल्याबद्दल मान्यवरांचे आभार आम्रपाली मोटे मँडम यांनी मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
.