श्री गजानन महाराज एक दिवसीय विजय ग्रंथ महापारायणाच्या आयोजना नंतर मानवत शहरात चार दिवशीय *श्रीरामचरित्र मानस रामायण ग्रंथाचे सामुहिक पारायणास सुरुवात
![](https://mcrnews.in/wp-content/uploads/2025/01/IMG-20250109-WA0020.jpg)
Correspondent / Anil chavan.
mcr.news / manawat
———————————————
अध्यात्म्याचे माहेरघर असलेल्या मानवत शहरात गेल्या आठ दिवसांपूर्वी श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण 15000 गजानन महाराज भक्तांच्या अमृतमय वाणीतून यशस्वीपणे संपन्न झाले. आता मानवत शहराचे माजी नगराध्यक्ष संजय बिहारीलालजी बांगड यांच्या यांच्या शेतात दिनांक
9 ते12 जानेवारी दरम्यान पुणे येथील रामकथाकार परमपूज्य कमलेशजी महाराज यांच्या मधुरमय वाणीतून श्री रामचरित्र मानस ग्रंथाचे संगीताच्या सुरात सामूहिक पारायणास
सुरुवात झाली आहे.
माजी नगराध्यक्ष संजय बांगर हे गेल्या 15 ते 16 वर्षापासून आपल्या निवासस्थानी दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये पुणे येथील
श्रीराम
कथाकार कमलेशजी महाराज यांच्या च मधुरमय वाणीतून श्रीरामचरित्र मानस ग्रंथाचे संगीतमय वातावरणात आयोजन करत आहेत.
यावर्षी दि.9 ते 12 जानेवारी दरम्यान चार दिवसीय श्रीराम चरित्र मानस ग्रंथाचे संगीतमय वातावरणात पारायणाचे आयोजन केले आहे.
येथील लक्ष्मी नारायण मंदिर ते संजय बांगड यांच्या शेतापर्यंत सकाळी साडेनऊ वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
यावेळी भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*