जिल्हातील सोयाबीन खरेदीची मूदत वाढवा, पणण मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे प्राचार्य अनंत गोलाईत यांची मागणी.
Correspondent / Anil chavan.
mcr.news / manawat
————————————————
परभणी जिल्हात सोयाबीन चे पिक बरे आले असून व्यापार पेठेत सोयाबीन मोठ्या प्रमाणात आले असल्यामूळे सोयाबीन खरेदीसाठी वाढ करण्यात यावी अशी मागणी माननीय श्री. जयकुमारजी रावल मंत्री, पणन व राजशिष्टाचार, यांच्याकडे एका निवेदनाद्बारे भाजपा ओबीसी नेते अनंत गोलाईत , भाजपा जिल्हा महामंत्री शिवाजीराव मव्हाळे, जिल्हाउपाध्यक्ष निहाल शेख यांनी केली.
जिल्हात सोयाबीन मोठ्या प्रमाणात असल्यामूळे सोयाबीन खरेदी साठी मुदतवाढ मिळावी अशा मागणीचे निवेदन अनंत गोलाईत यांनी राज्याचे मंत्री मा. जयकूमार रावल यांच्याकडे केली.
सविस्तर वृत्त असे की, उपरोक्त विषयी आपणास विनंती करण्यात येते की, केंद्र शासनाच्या पीएसएस योजने अंतर्गत खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये सोयाबीन नोदणी व खरेदी प्रकिया सुरू आहे. नोंदणी साठी दोन वेळा मुदत वाढ मिळाली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तसेच मागील १५ ते २० दिवसांपासून बारदाना तुटवड्यामुळे संपुर्ण राज्यात सोयाबीन खरेदी बंद आहे आणि खरेदीची अंतिम मुदत हि १२ जानेवारी २०२५ असल्यामुळे अनेक शेतकरी खरेदीपासुन वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीन खरेदीची मुदत किमान २ महिने वाढवण्यात यावी मागणी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश चिटणीस प्राचार्य अनंत गोलाईत भाजपा जिल्हा महामंत्री शिवाजीराव मव्हाळे, जिल्हाउपाध्यक्ष निहाल शेख यांनी यावेळी केली.
*