यशवंत ‘ मधील मुलींचा संघ प्रथम क्रमांकाने विजयी
नांदेड – (८ जानेवारी २०२५)
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन रस्सीखेच स्पर्धा या स्वामी विवेकानंद विद्यालय, मुक्राबाद, ता. मुखेड येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये यशवंत महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी अहमदपूरच्या महात्मा फुले कॉलेजला पराजित करून प्रथम क्रमांक पटकावला.
या संघामध्ये संघप्रमुख विनेश्री गडगीळे , आशा भरकाड, कोमल गडमवाड, आशा धाबे, कविता चिप्पेवार ,अंकीता भारती, नेहा गोंदगे, चेतना पांचाळ, सोनाली सावते व अर्पिता चाफे या खेळाडूंचा सहभाग होता.
तसेच मुलांनीही तिसरा क्रमांक पटकावला. या संघात संघप्रमुख प्रसेनजीत जाधव, राम जाधव, तुकाराम कंजाळकर, कृष्णा गव्हाणे ,सुरज गव्हाणे, ज्ञानदिपक ढगे, संतोष मेटकर, गोविंद, भीमाशंकर चव्हाण या खेळडूंचा समावेश होता.
विजेत्या संघाला क्रिडाप्रमुख डॉ. मनोज पैंजने, डॉ. राहुल वाघमारे आणि किरण नागरे यांचे मार्गदर्शन लाभले.
विजयी संघाचे माजी प्र-कुलगुरु प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ. हरिश्चंद्र पतंगे यांनी यथोचित सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
या संघातर्फे अतिशय चांगली कामगीरी केलेल्या खेळाडूंची निवड ही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाच्या संघासाठी होईल.
विजयी संघाचे उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयीका डॉ.एल.व्ही. पदमाराणी राव, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे तसेच सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.