तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता तारुण्याचे तीन त’कार -डॉ.विश्वाधार देशमुख
*
दि. (९ जाने. २०२५)
तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता हे तारुण्याचे तीन त’कार आहेत, असे प्रतिपादन यशवंत महाविद्यालयातील मराठीचे साहित्यिक डॉ. विश्वाधार देशमुख यांनी रासेयो यशवंत महाविद्यालयाच्या निवासी शिबिराच्या उदबोधन सत्रात मरळक येथे केले.
डॉ.विजय भोसले अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मराठी विभागाचे डॉ.विश्वाधार देशमुख होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुढे डॉ. विश्वाधार देशमुख यांनी, तारुण्याचे तीन त’कार या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता ही तारुण्याची तीन प्रमुख लक्षणे असून यासाठी वयाची कुठलीही अट नसते, असे प्रतिपादन केले. शहीद भगतसिंग, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची उदाहरणे देत तारुण्य काय असते, हे विद्यार्थ्यांसमोर ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
अध्यक्षीय समारोपात डॉ.विजय भोसले यांनी, विवेकानंदाचे जीवन व कार्य विद्यार्थ्यांसमोर ठेवत असताना नवीन पिढीने विवेकानंदांच्या जीवन व कार्यापासून खूप काही शिकणे गरजेचे आहे, असे सुचवले.
माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित शिबिर व प्रत्येक सत्रात बौद्धिक व्याख्यानाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्जन गीते यांनी केले तर आभार ऋतुराज डोंगळीकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी डॉ. कैलास इंगोले, डॉ. राजरत्न सोनटक्के, प्रा. अभिनंदन इंगोले, प्रा. श्रीराम हुलसुरे व स्वयंसेवकांनी प्रयत्न केले.
शिबिरातील विविध उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ.हरिश्चंद्र पतंगे, कार्यक्रमाधिकारी प्रा.राजश्री भोपाळे, डॉ.कांचन गायकवाड, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, नाना शिंदे, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे आदी सहकार्य करीत आहेत.