ताज्या घडामोडी

नागरजवळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळे मध्ये किशोरी मेळावा संपन्न.

मानवत / प्रतिनिधी.
दिनांक 21 सप्टेंबर रोजी आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत नागरजवळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळळेमध्ये आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना आरोग्य शिक्षण, दातांची निगा आणि किशोरवयीन मुलींसाठी किशोरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
मानवत येथील सुप्रसिद्ध स्त्री- रोग तज्ञ डॉ. सौ शरयू शशांक खेकाळे यांनी इयत्ता पाचवी ते आठवीच्या मुलींना विशेष मार्गदर्शन केले. या वेळी किशोरवयीन मुलींनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत माहिती दिली.
तर प्लास्टिक पिशव्या न वापरता कापडी पिशव्या वापरल्या पाहिजेत, शिक्षणासोबतच संस्कार किती महत्त्वाचे आहेत याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना गोष्टीतून माहिती दिली कुठल्याही कामात दृष्टिकोन किती महत्त्वाचा आहे हे त्यांनी कृती पेक्षा विचार महत्त्वाचा या गोष्टीतून सांगितला या कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.शकुंतला गणेश होगे,सौ.पुजा दत्ता नायबळ, श्रीमती राणी दसमले मॅडम, श्रीमती शोभा गिरी मॅडम यांच्यासह अनेक माता-भगिनी उपस्थित होत्या तसेच यावेळी डॉ .ज्योती डमढेरे दंत चिकित्सक यांनी विद्यार्थ्यांना दातांची निगा यांविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती राणी दसमले मॅडम यांनी केले तर चि. श्रीराम गंगाधर होगे या विद्यार्थ्यांने
आभार प्रदर्शन केले.
मेळावा यशस्वी करण्यासाठी श्रीमती शोभा गिरी मॅडम,श्री.माणिक आवचार , श्री.विकास जुकटे , आणि श्री.सोनय्या किर्तनकार यांनी परिश्रम घेतले.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.