ताज्या घडामोडी

रासायनिक खतांपेक्षा गोखूर सर्वश्रेष्ठ खत सर्वांसाठी किफायत व फायदेशीर :महामंडलेश्वर १००८ ह.भ.प. मनिषानंदजी पूरी

मानवत / प्रतिनिधी.

रासायनिक खतामूळ जमीनीचा पोत घसरत आहे. खतांपेक्षा राज्यातील शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात गोखूर खत शेतीसाठी वापरले तर त अतिशय फायदेशीर असून *गोखूर* खताचा वापर शेतकर्‍यांनी केल्यामुळे शेती विषमुक्त होऊन अनेक व्याधीपासून बचाव होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी *गोखुर* खताचा मोठ्या प्रमाणावर वापर करायला हवा, असे आवाहन *महामंडलेश्वर १००८ स्वामी मनिषानंद पुरी* महाराज यांनी केले.
*सविस्तर वृत्त असे की,*

मानवत तालुक्यातील रामेटाकळी येथील *पसायदान गोरक्षण संस्थेच्या* वतीने आयोजित करण्यात आलेल्या भूमिपूजन कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी परभणी लोक सभा मतदार संघाचे माजी खासदार, जन सामान्याचे लोकनेते बहूजनांचे कैवारी. बापूसाहेब , अॅड. गणेशरावजी दुधगावकर, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. केशवराव सांगळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेवराव आघाव, डॉ. केदारजी खटींग, रामेटाकळी ग्राम पंचायतीच्या दूरदृष्टी महिला सरपंच मंदाताई गंगाधररावजी कदम यांची या प्रसंगी प्रमूख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना माजी खासदार बापूसाहेब गणेशरावजी दुधगावकर म्हणाले, एखादी योजना राबवताना
मनीषानंद पुरी महाराज यांचे मत, रामेटाकळीत भूमिपूजन सोहळा
सार्वजनिक क्षेत्रातील भागिदारी वाढली तर अधिक चांगल्या पद्धतीने ती यशस्वी होते.
शासनाच्या दफ्तरी अडकून पडलेली अंमलबजावणीत अनेक अडथळे येतात, असे ते म्हणाले. संस्थेचे सचिव माणिक रासवे यांनी मत व्यक्त करताना ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे आतापर्यंत हजारो गायी वाचविता आल्या. गोखुर खतालाही मोठी मागणी असते. संस्थेच्या माध्यमातून गांडूळ खत निर्मितीचे प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले असून लवकरच पंचगव्य निर्मिती सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश कडतन यांनी केले.
गेल्या १५ वर्षांपासून गोसंवर्धन
रामेटाकळी येथील पसायदान गोरक्षण संस्था मागील १५ वर्षांपासून गोसेवा व गोसंवर्धन करीत आहेत. विशेषतः भाकड गायी सांभाळण्याचे काम संस्थेमार्फत केले जात असून सद्यस्थितीत संस्थेत दीडशेपेक्षा जास्त देशी गायींचे संगोपन करण्यात आले आहे.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.