ताज्या घडामोडी

यशवंत ‘ मध्ये इतिहास अभ्यासक्रमावर विद्यापीठस्तरीय कार्यशाळेचे आयोजन

नांदेड:(दि.२२ सप्टेंबर २०२४)
यशवंत महाविद्यालयातील पदवी, पदव्युत्तर इतिहास विभाग व संशोधन केंद्र आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पदव्युत्तर इतिहास विषयाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण: २०२० अनुसार नवीन अभ्यासक्रमावर आधारित एकदिवसीय विद्यापीठस्तरीय कार्यशाळेचे आयोजन विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार दि.२३ सप्टेंबर, सोमवार रोजी इंग्रजी भाषा व प्रयोगशाळा येथे करण्यात आले आहे.
कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थान श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव माजी प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर भूषविणार आहेत. उद्घाटक विद्यापीठाच्या मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग खडके आहेत. प्रमुख अतिथी विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. राहुल वरवंटीकर उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे .
प्रथम सत्रामध्ये आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास पेपरवरील चर्चासत्राचे अध्यक्ष डॉ. रमेश गंगथडे, इतिहास विभागप्रमुख, कर्मयोगी तुळशीराम पवार महाविद्यालय, हाडोळती तर याप्रसंगी डॉ. विजया साखरे, श्री. शिवाजी कॉलेज, कंधार या साधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
मराठवाड्याचा इतिहासावरील चर्चेत सत्राध्यक्ष डॉ.बाळासाहेब क्षीरसागर, शिवाजी महाविद्यालय ,हिंगोली आहेत तर साधन व्यक्ती म्हणून डॉ. वसंत कदम, हुतात्मा जयंतराव पाटील महाविद्यालय, हिमायतनगर मार्गदर्शन करणार आहेत तर दुसऱ्या सत्रामध्ये आग्नेय आशियाचा इतिहासावरील चर्चेत डॉ. नितीन बावळे, शारदा महाविद्यालय, परभणी सत्राध्यक्ष रहाणार आहेत तर डॉ. ओमशिव लिगडे ,शिवजागृती महाविद्यालय, नळेगाव साधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
पर्यटनावरील चर्चेत सत्राध्यक्ष डॉ. दिलीप पाईकराव, नागनाथ महाविद्यालय, औंढा सत्राध्यक्ष असणार आहेत तर डॉ. अरविंद सोनटक्के, श्री.दिगंबरराव बिंदू महाविद्यालय, भोकर साधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
संशोधन प्रकल्प विषयावरील चर्चेत सत्राध्यक्ष डॉ. राजेसाहेब भोसले, संभाजी महाविद्यालय, मुरुड सत्राध्यक्ष असणार आहेत तर डॉ. सदाशिव दंदे, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय ,लातूर व डॉ.हनुमान मुसळे स्व. नितीन महाविद्यालय ,पाथरी मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यशाळेचा समारोप प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून प्रमुख पाहुणे डॉ. रामभाऊ मुटकुळे, बहिर्जी स्मारक महाविद्यालय, वसमत उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.राहुल वरवंटीकर यांची उपस्थिती असणार आहे.
कार्यशाळेत प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. शिवराज बोकडे, डॉ. संगीता शिंदे (ढेंगळे), डॉ. साईनाथ बिंदगे, प्रा.राजश्री भोपाळे यांनी केले आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.