ताज्या बातम्या
नागरजवळा येथे शेतकर्यांच्या नुकसान झालेल्या पिकाची पाहणी

मानवत / प्रतिनिधी.
मानवत तालुक्यातील मौजे नागरजवळा येथील शेतकरी गंगाधर होगे यांच्या शेती पिकाची महसूल प्रशानाचे अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी पी. आर. माने, तलाठी श्रीमती बिबेकर यांच्या वतीने पाहणी करून पंचनामे करण्यात आले. दिनांक १७ आणि १८ मार्च रोजी मानवत तालूक्यात झालेल्या गारपिट व अवकाळी पावसाने मानवत तालुक्यात अनेक ठिकाणी शेती पिकाचे मोठे नुकसान झाले असून नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार श्रीमती पल्लवी टेमकर यांनी दिले असता नागरजवळा येथील शेती पिकाची पाहणी करून पंचनामा करताना महसूल विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांच्यासह शेतकरी दिसत आहेत.
***