ताज्या बातम्या

रमजानचा दुसरा रोजा संपन्न

L

मानवत // प्रतिनिधी.

मानवत : रमजान महिन्याला सुरुवात झाली असून त्यानिमीत्त शहरातील बाजारपेठ गजबल्याचे दिसून येते. बाजारपेठेत विविध रोजा खाद्य पदार्थची विक्री व खरेदी सुरु आहे. रमजानच्या चंद्राचे गुरुवार दि. 23 मार्च 2023 रोजी संध्याकाळी दर्शन झाल्याने शुक्रवार दि. २४ रोजी पहिल्या रोजाला सुरुवात झाली असून सायंकाळ मगरीबच्या नमाजनंतर विविध मशिदींतून रमजान महिन्याला सुरवात झाल्याची माहिती देण्यात आली होती… चंद्रदर्शन झाल्याने सर्वांनी
एकमेकांना शुभेच्छा दिल्या. चंद्रदर्शन झाल्याने गुरुवार पासून विशेष नमाज तरावीह ला सुरवात झाली.
रमजानमध्ये सायंकाळी मगरीब नमाजच्या वेळी उपवास सोडला जातो. दिवसभर रोजा ठेवल्यानंतर सायंकाळी इफ्तारमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळे, पेंडखजूर हमखास असतात. शहरातील पेठ महोल्ला परिसरात
नागरीकांच्या वतीने फळांची विक्री केल्या जात आहे…
नागरिकांची मोठी गर्दी असल्यामुळे मानवत पोलीस स्टेशनच्या वतीने बॅरिकेट लावून पोलीस निरीक्षक रमेश स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली शेख जावेद, सय्यद फय्याज, गोपीनिय शाखेचे अतुल पंचांगे, विलास मोरे,खंडु राउत, बंदोबस्त करीत आहे…….

इस्लाम धमार्तील कलमा, नमाज,
रोजा, जकात, हज या पाच स्तंभापैकी रोजा एक आहे. मानवत येथे पहाटे सहेरची वेळ ५.१७ मिनिटे तर सायंकाळी ६.४६ मिनिटाला इफ्तारची वेळ आहे….

**०

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button