ताज्या घडामोडी

आंतरमहाविद्यालयीन ‘क झोन’ तलवारबाजी स्पर्धेत प्रतिभा निकेतनचे यश

नांदेड:
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि प्रतिभा निकेतन महाविद्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन क झोन क्रीडा स्पर्धेत पाटील पल्लवी या खेळाडूंनी तलवारबाजी या क्रीडा प्रकारात (foli) तृतीय क्रमांक प्राप्त केला.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किशोर गंगाखेडकर, प्रभारी क्रीडा संचालक डॉ. दीपक वाघमारे, उप-प्राचार्य डॉ. दिलीप स्वामी, डॉ.पी. निळकंठराव, डॉ. श्रीमंत राऊत, डॉ.संजय हापगुंडे, डॉ.मारोती लुटे, डॉ.रवींद्र लाटकर, राहुल वरवंटीकर यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेत पीपल्स महाविद्यालय नांदेड, यशवंत महाविद्यालय नांदेड, विज्ञान महाविद्यालय नांदेड, एमजीएम पत्रकारिता महाविद्यालय नांदेड व शरदचंद्र महाविद्यालय नायगाव इत्यादी महाविद्यालयीन संघाने सहभाग नोंदवला होता.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.