https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत येथे राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठक संपन्न

शासकिय विश्राम गृहाच्या सभागृहात विविध पदाधिकारी यांच्या नियुक्त्या जाहिर.

मानवत / प्रतिनिधी.

मानवत शहरातील शासकीय विश्राम गृह येथे १४ जानेवारी रोजी राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. महादेवजी जानकर यांच्या आदेशा नुसार राष्ट्रीय समाज पक्षाच्या मिशन परभणी लोकसभेचा तयारीसाठी सुरू असलेल्या जनसंवाद दौऱ्याच्या अनु षंगाने या बूथ बांधणी आढावा बैठकी चे आयोजन करण्यात आले होते बैठकीस राष्ट्रीय समाज पक्षाचे मराठ वाडा उपाध्यक्ष मा. ज्ञानोबा ताटे, विलास गाढवे, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दुगाणे, राम मरगळ, जनार्दन परकड, राजाभाऊ हिंगे यांची उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचा तालुका कार्यकारीणीवर ज्ञानेश्वर हिंगे, भगवान निळे, साहेबराव डोके, गोविंद क्षिरसागर, गोविंद ताल्डे, विजय यमगीर या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून त्यांना निवडीचे नियुक्त पत्र देण्यात आले. व मानवत तालुक्यातील प्रत्येक गावा गावात जाऊन बूथ बांधणी साठी गावभेट दौरा आयोजित करून नियोजन करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या कार्यक्रम यशस्वीते साठी राष्ट्रीय समाज पक्षाचे मानवत तालुकाध्यक्ष बंटी (लिंबाजी) बनगर व सहकाऱ्यांनी प्रयत्न केले.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704