https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवतरोड येथील जिजाऊ ज्ञानतिर्थ विद्यालयाचे चाळीस विद्यार्थी विज्ञान वारीत सहभागी.*

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालूक्यातील मानवतरोड येथील जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयाचे 40 शालेय विद्यार्थी विज्ञानवारी 2024 मध्ये सहभागी झाले. शालेय विद्यार्थ्यां मध्ये जिज्ञासू वृत्ती व वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त पुणे विद्यापीठ आयुका तर्फे आयोजित विज्ञान प्रदर्शनास तालूक्यातील मानवतरोड येथील जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयातील इयत्ता वर्ग 6 वी ते 9 वीच्या 40 शालेय विद्यार्थ्यांनी भेट दिली. दरवर्षीप्रमाणे मानवतरोड येथील जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालया तर्फे विज्ञानवारी 2024 उपक्रम आयोजित करण्यात आला. या प्रदर्शनासाठी इयत्ता 6 वी ते 9 वी वर्गाची निवड चाचणी घेऊन प्रत्येक वर्गातून पहिले 10 विद्यार्थी असे मिळून 40 विद्यार्थी निवडले गेले. या मध्ये विद्यार्थ्यांनी ( LIGO, GMRT, IUCAA ) सारख्या संस्था तसेच आदित्य एल वन मध्ये पाठवलेल्या SUIT (solar ultraviolet imaging telescope) या उपकरणाची माहिती मिळवली व आयुकाचे संस्थापक अध्यक्ष खगोल शास्त्रज्ञ मा. डॉ. जयंत नारळीकर व आयुक्त संचालक प्रा. आर श्री आनंद यांच्या आस्क अ सायंटिस्ट या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी संवाद साधला त्यांनी या वेळी विविध प्रश्न विचारले
या उपक्रमात सहभागी झाल्या बद्दल विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष रामरावजी लोहट, संस्थेचे सचिव तथा मुख्याध्यापक प्रा.नितीनजी लोहट , संस्थेच्या संचालिका सौ.उषाताई लोहट , पर्यवेक्षक श्री. सुरेशजी भिसे विभाग प्रमुख श्री.अशोकजी दुधारे, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख डी के गडगिळे , प्राथमिक विभाग प्रमुख वाघ सर, पूर्व प्राथमिक विभाग प्रमूख पामे सर, स्पर्धा परीक्षा विभागप्रमुख हातागळे सर काळे सर रंजन सर सोनू सर सलमान सर आदीसह शिक्षकवृंद यांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या

*💐💐💐💐💐💐💐

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704