https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत येथील पी. एम. श्री. जिल्हा परिषद केद्रीय प्राथमिक शाळा महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराने सन्मानीत

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" अभियानात जिल्हा व तालुक्यातुन प्रथम

**

मानवत / प्रतिनिधी.

राज्य शासनाच्या वतीने ” मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ” हे अभियान ०१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत राबविण्यात आले होते या अभियानात मानवत येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेने तालुक्यातुन प्रथम व जिल्ह्यातुन प्रथम तर विभागात दुसरा क्रमांक पटकावला आहे या यशाबद्दल राज्याचे कर्तव्यदक्ष व दूरदृष्टी मुख्यमंत्री मा. श्री एकनाथरावजी शिंदे व शिक्षण मंत्री मा. श्री दीपकजी केसरकर यांच्या उपस्थितीत मुंबई येथील टाटा थिएटर नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एन. सी. पी. ए) नरिमन पॉईंट येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी शिक्षक नेते मा. संभाजीराव तात्या थोरात हे देखील उपस्थित होते त्याच बरोबर शिक्षक आमदार मा. विक्रमजी काळे व मा. कपिल पाटील, शिक्षण आयुक्त मा. सुरज मांढरे व सचिव शालेय शिक्षण विभाग मा. रणजितसिंह देओल हे उपस्थित होते. या पुरस्कारामध्ये शाळेसाठी सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व पंधरा लाख रुपयांचा धनादेश देऊन शाळेला गौरविण्यात आले.
शाळेच्या या यशा बद्दल शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोहन भाऊ लाड, उपाध्यक्षा श्रीमती. कविताताई धबडगे शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सन्माननिय सदस्य, गट शिक्षणाधिकारी श्री. मुकेशजी राठोड, केंद्र प्रमुख श्री. शिरीषजी लोहट, शाळेचे मुख्याध्यापक श्री. गोरोबा बनसोडे, विद्यार्थी, पालक तसेच शिक्षक श्री. दिलीपराव लाड, रामरावजी सोळंके, बाबासाहेब पानझाडे, नामदेव खिळदकर, कर्णराज दुधाळ, महावीर शेळवणे, संजय पकवाने, सचिन निलवर्ण, राजकुमार लांडे, संजय परभणीकर, दगडुराम बोरकर, केशव गिरी, मारुती रोकडे, सुनिल चौधरी, शेख इरफान, संदीप काळे, सुनिल पदमवार, श्रीमती उज्वलाताई जत्ती, सत्यभामाताई गिरी, अनिताताई खरात, जोत्स्नाताई पौळ ,मीराताई मंगरूळकर, प्रज्ञाताई काळे, ज्योतीताई टेंगसे, यांचे शिक्षणाधिकारी श्री. गणेशजी शिंदे , श्री. संजय ससाणे शिक्षणाधिकारी योजना यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704