https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

युवकांनी देशाच्या सीमेवरील सैनिकांचे शौर्य व बलिदान स्मरणात ठेवावे -मा.श्री.नरेंद्र चव्हाण

नांदेड:( दि.११ मार्च २०२४)
कारगिल युद्धामध्ये शहीद झालेला पहिला जवान २१ वर्षाचा होता. मिल्ट्री रुजू केल्यानंतर त्याचा पहिला पगारही झाला नव्हता. आज आपण जे सुरक्षित जीवन जगत आहोत. जीवनाचा आनंद घेत आहोत. मनोरंजनात सहभागी होत आहोत. त्याचे संपूर्ण श्रेय देशाच्या सैनिकांकडे जाते. युवकांनी देशाच्या सीमेवरील सैनिकांचे शौर्य व बलिदान स्मरणात ठेवावे; असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य व श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारणी सदस्य मा.श्री. नरेंद्र चव्हाण यांनी केले.
यशवंत महाविद्यालयात ‘यशवंत युवक महोत्सव’ गीत संगीत सादरीकरण स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.
याप्रसंगी विचारमंचावर संस्थेचे सहसचिव माजी प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, युवक महोत्सव समन्वयक डॉ.संजय ननवरे, गीत संगीत सादरीकरण स्पर्धा समन्वयक डॉ.एल.व्ही. पदमाराणी राव, प्रा.संगीता चाटी,परीक्षक सौ.अनुपमा पाटील, प्रा.किरण सावंत यांची उपस्थिती होती.
अध्यक्षिय समारोपात माजी प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर यांनी, यशवंत युवक महोत्सव विविध स्पर्धेतील सहभागातून कौशल्यपूर्ण विद्यार्थ्यांची निर्मिती होईल. युवक महोत्सवातील विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय आहे, असे मत व्यक्त केले.
प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, यशवंत युवक महोत्सवात जवळपास ८०० पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. केवळ चित्रपटातील नाच-गाणे यावर आधारित स्नेहसंमेलन ठेवल्यास केवळ २० ते २५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असता. मात्र आता हे चित्र पालटले आहे. गीत संगीत सादरीकरणातही देशभक्तीपर गीत, शास्त्रीय संगीत, वाद्य याचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यातून निश्चितच प्रत्येकास देशप्रेमाची प्रेरणा भेटेल, असे मनोगत व्यक्त केले.
सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा.संगीता चाटी यांनी केले तसेच आभार देखील मानले.स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी समन्वयक डॉ.एल.व्ही. पदमाराणी राव, डॉ.शिवदास शिंदे, प्रा.संगीता चाटी, डॉ.सुभाष जुन्ने, डॉ.विश्वाधार देशमुख, डॉ.संदीप पाईकराव, प्रा.राजश्री भोपाळे, डॉ.डी.एस.कवळे, डॉ.दीप्ती तोटावार, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, व्ही.पी.सिंग ठाकूर, डॉ.अजय गव्हाणे, शिक्षकेत्तर कर्मचारी गोविंद ठाकूर, ओम आळणे, गोविंद शिंदे,किसन इंगोले,डी.आर.टरके, माणिक कल्याणकर, माधव भोसले, पी.आर.अवधूतवार, बी.एल. बेलीकर, डी.एस.ठाकूर,आनंदा शिंदे, पी.बी.साखरे, श्री.गोरठकर यांनी सहकार्य केले.
या स्पर्धेचे संपूर्ण सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले. त्यामध्ये नरेंद्रकौर भानौत, कृष्णा वाघमारे, शर्मिन मेहबूब शेख, आशिष चव्हाण, निकिता गाडेकर, वैष्णवी तोरडमल, तबस्सूम शेख, निकिता नवाथे या विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्कृष्ट व यशस्वी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमास विविध विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704