ताज्या घडामोडी

एम सी आर न्यूज कवयित्री आपल्या भेटीला “किमयागार”:लैलेशा भुरे

*किमयागार*
**************************
झरझरते ऊन पानांवरूनी
रंग सोनेरी खुणावतो मला
ऐकू येई साद पक्ष्यांची
आठवणींचा रंगझुला

मन अल्लड वा-यापरी
शोधते ती एकल वाट
भेट घडते त्या वाटेवर
निसर्गाशी पडते गाठ

वाराही घालीतो शीळ
तनामनाच्या भोवताली
अलगद मन उडे वा-यासवे
लाली उमटते माझ्या गाली

हळूच सरते ऊन कोवळे
जादूगर ते क्षितिजापार
वेचिते मी फांद्यांमधुनी
आठवणींची सुमने किमयागार
**************************
लैलेशा भुरे
नागपूर

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.