गुरुजी रुग्णालयात मोफत फ़िजिओथेरपि शिबिराचे आयोजन.

नांदेड- दि :- २७ जानेवारी २०२३.
श्री गुरुजी रुग्णालयातील फिजीओथेरपी विभागाला ४ वर्ष पूर्ण झाल्याच्या औचीत्याने, दि. २९ जानेवारी २०२३ रोजी श्री गुरुजी रुग्णालय, छत्रपती चौक, नांदेड येथे सकाळी १० ते ४ या वेळेत ßमोफत फ़िजिओथेरपि शिबीराचे आयोजन केले आहे”. समाजातील सर्व गरजू व मध्यमवर्गीय आणि गरीब रुग्णांना अत्यंत माफक दरात उच्चतम सेवा देण्यासाठी व ग्रामीण व शहरी भागातील जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने शिबिराचे आयोजन केले आहे.
या शिबिरात गुडघेदुखी-कंबरदुखी मोफत तपासणी व फ़िजिओथेरपि उपचार केले जाणार आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने १. वयोमानानानुसार झिजलेले गुडघे २. मार लागल्या नंतर दुखावलेले गुढघे ३. ऑपरेशन झालेले गुढघे ४. वयानुसार पाठीचे दुखणे ५. पाठीचे झालेले ऑपरेशन ६. मार लागल्या नंतर पाठीचे दुखणे ७. सांधी दुखीवर उपचार ८. रुग्णावर योग्य तो व्यायाम व इलेक्ट्रोथेरपी द्वारे उपचार यांचा समावेश आहे.
रुग्णांवर, रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर्स चमू डॉ- राजेंद्र पाटील (BOTH, DPT, DHMS, MA), डॉ. गणेश कदम (B.P.T), डॉ. यामिनी कोकरे (B.P.T), डॉ. कलेश्वर तरटे (B.P.T), डॉ. अनुजा कल्याणकर (B.P.T), डॉ. विजया गुंडेवार (B.P.T), हे उपचार करणार आहेत.
रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहिती व नावनोंदणी साठी :-9370638837/02462-359699 या क्रमांकावर संपर्क साधावा.
तरी गरजूंनी मोफत फ़िजिओथेरपि शिबीराचा” लाभ घेण्याचे आवाहन, श्री गुरुजी रुग्णालयाच्या व्यवस्थापना कडून करण्यात येत आहे.