ताज्या बातम्या

लोकशाही बळकट करण्यासाठी नवमतदारांनी नोंदणी करून मौलिक मतदान करावे: कुलगुरू डॉ. उद्धव भोसले

नांदेड (mcrnews) दि 25:- जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून जग आपल्याकडे पाहते. लोकशाहीला बळकट करण्यासाठी नवमतदारांनी म्हणजेच १८ वर्षे पूर्ण केलेल्या नवमतदारांनी आपल्या मतदानाची नोंदणी करून मतदानाच्या पवित्र कर्तव्याचे पालन करावे असे आवाहन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राष्ट्रीय मतदार दिन २०२३’ कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यापीठातील सभागृहात आयोजित या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर, उपविभागीय अधिकारी विकास माने, उप निवडणूक अधिकारी श्रीमती संतोषी देवकुळे. तहसीलदार किरण आंबेकर, मतदार नोंदणी अधिकारी ब्रिजेश पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांची उपस्थिती होती.

मतदानाची टक्केवारी ही अपेक्षेपेक्षा खूप कमी प्रमाणात असते. लहान गावापेक्षा मोठ्या शहरांचीघटनारी मतदानाची टक्केवारी काळजी करण्यासारखी आहे. देशाची लोकशाही सदृढ होण्यासाठी नवमतदारांना मतदानाची नोंदणी करून नैतिकतेने मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

२५ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रीय निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे. या स्थापना दिनाच्या माध्यमातून लोकशाही बद्दलची जनजागृती करून नवमतदारांना मतदान करण्यास नोंदणी करून मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा उद्देश या कार्यक्रमाचा असल्याचे अपर जिल्हाधिकारी बोरगावकर यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कार्यक्रमांमध्ये मतदार नोंदणीमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ब्रिजेश पाटील, उत्कृष्ट नायब तहसिलदार डी. एन. पोटे, रामराव पंगे, उत्कृष्ट अव्वल ल कारकून फैय्याज अहमद युसुफ खान, उत्कृष्ट महसूल सहाय्यक शरद बोरामने, संदीप भुरे, गजानन मठपती, उत्कृष्ट संगणक चालक विनोद मनवर, बबलू महेबूबसाब अत्तार, उत्कृष्ट संगणक मतदार केंद्रस्तरीय अधिकारी जी.बी.मरशिवणे, उद्धव रंगनाथराव कदम, गणेश कहाळेकर, श्रीमती वर्षा गरड, बालाजी विधमवार इत्यादी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

उपस्थित मतदारांना बोरगावकर यांनी ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ मतदारांसाठीची प्रतिज्ञा दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार मुगाजी काकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन फैय्याज अहेमद युसुब खान यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button