https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत तालूक्यातील सावळी येथे विकसित भारत यात्रा कार्यक्रम उधळला

मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लागे पर्यंत शासकीय कार्यक्रम रद्द करण्याची मागणी

> सकल मराठा समाज बांधवाचा एकमुखी निर्णय < __________________________________ मानवत / प्रतिनिधी. सद्या सर्वत्र विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ तालूक्यातील प्रत्येक ग्रामीण भागात जाऊन केंद्र शासनाचा विविध योजना लाभार्थ्यापर्यंत पोहचण्याचे काम सुरु असून मानवत तालुक्यातील मौ. सावळी येथे विकसित संकल्प भारत यात्रा कार्यक्रम *सकल मराठा समाज* बांधवानी बंद करून उधळून लावला आहे. जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत सावळी येथील गावात कोणत्या ही प्रकारचा शासकीय कार्यक्रम होऊ दिल्या जाणार नाही. तसेच तो घेऊ नये असा एक मताने निर्णय सकल मराठा समाज बांधवानी घेतला आहे. केंद्र शासनातर्गत ग्रामीण भागात शासकीय योजनाची माहिती व्हावी या अनुषंगाने ०८ डिसेंबर रोजी सकाळी मानवत तालुक्यातील मौ. सावळी येथे विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमे अंतर्गत जनजागृती रथ दाखल झाला होता परंतु सकल मराठा समाज बांधवानी या कार्यक्रमास विरोध दर्शवत सदरील कार्यक्रम बंद पाडला तसेच जो पर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तो पर्यंत कोणता ही शासकीय कार्यक्रम गावात घेण्यात येऊ नये असा निर्णय सकल मराठा समाज बांधवानी घेतला असून सदरील बाबतचे निवेदन सावळी ग्राम पंचायतीचे ग्राम विकास अधिकारी कृष्णा कानडे यांना देण्यात आले. यावेळी निवेदनावर नामदेव काळे, विठ्ठलराव काळे, महादेव काळे काळे, अर्जुन काळे, नितीन काळे, दत्ता काळे, आसाराम काळे, माणिकराव बाबुराव काळे, माणिक काळे, गोपाळ काळे, बाळासाहेब काळे, भागवत काळे, प्रभाकर काळे, हनुमान काळे, सुरेश काळे, रामप्रसाद काळे, अर्जुन काळे, प्रकाश काळे, सर्जेराव काळे, अमोल काळे, शंकर काळे, ज्ञानोबा काळे, केशव काळे, पुरुषोत्तम काळे, कृष्णा काळे, आकाश काळे, अनिल काळे, महारुद्र काळे, रंगनाथ रनेर, संजय ईक्कर, भारत काळे, बालासाहेब काळे, तुकाराम काळे, आत्माराम काळे, भानूदास काळे, ज्ञानेश्वर काळे, गणेश काळे, साक्षी काळे, वैष्णवी काळे, पल्लवी काळे, धनंजय काळे, ज्ञानोबा द. काळे, अनिल छत्रभुज काळे यांच्या सह *सकल मराठा समाज* बांधवाच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. ***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704