शिवकाळ हा भारताच्या इतिहासातील सोनेरी पर्वाचा काळ-प्रा.अनंत मोगल.

मानवत // प्रतिनिधी.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातुन आजच्या तरुणाने आत्मविश्वासाने जगण्याची प्रेरणा घेतली पाहिजे. महापुरुषांच्या विचारांचा शोध हा समाजाचा आणि स्वतःचा ही शोध असतो. मन, मनगट, मेंदू सशक्त करण्याची प्रेरणा आपण शिव चरित्रातुन आत्मसात केली पाहिजे असे विचार शिवचरित्रातुन आजच्या तरुणाने काय शिकावे ? या विषयावर बोलताना प्रा. अनंत मोगल यांनी आपले विचार मांडले.
सविस्तर वृत्त असे की,
मानवत येथील के. के. एम. महाविद्यालयाच्या वतीने मानवत तालूक्यातील मौजे आटोळा या ठिकाणी आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवासी शिबिराच्या प्रसंगी आपले विचार व्यासपीठावरून व्यक्त केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. कैलाश बोरुडे हे उपस्थित होते. तसेच डॉ. शाम पवार, डॉ. पंकज चालिकवार, डॉ. प्रदिप गिरासे, डॉ. राधेश्याम राठी, प्रा. प्रकाश गवळी , कार्यक्रमाधिकारी डॉ. बाळासाहेब गिते व डॉ. पवन बारहात्ते पाटील यांची उपस्थिती होती.
या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे प्रत्येका साठी प्रेरक आणि प्रेरणादायी असे आहे. शिवचरित्रातुन आपण महाराजांनी निर्माण केलेली मुलभूत व्यवस्था समजून घेणे आवश्यक आहे. या निमित्ताने उपस्थित डॉ. शाम पवार यांनी संविधान समजून घेताना या विषयावर आपले विचार व्यक्त केले. स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय ही मुल्य आपण जोपासली पाहिजे असे मत त्यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना व्यक्त केले. तर अध्यक्षीय समारोप करताना डॉ. कैलाश बोरुडे म्हणाले की, महाराजांनी निर्माण केले ले स्वराज्य हे खऱ्या अर्थाने रयतेचे, कष्टकरी, श्रमकरी,लोकांचेच राज्य होते. असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.
या वेळी कार्यक्रमाचे सुत्र संचालन स्वयंसेविका वैष्णवी दहे तर आभार शारदा गायकवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व स्वयंसेवक स्वयंसेविकांनी परिश्रम घेतले.
***