नेहरू युवा केंद्र व सांची मित्र मंडळाच्या वतीने मानवत येथे रक्तदान शिबीर संपन्न

मानवत / प्रतिनिधी.
प्रजासत्ताक दिना निमित्त मानवत येथे नेहरू युवा केंद्र व सांची मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी या रक्तदान शिबीराचे उदघाट्न मानवत न. पा. चे माजी. नगरसेवक आनंद भदर्गे, माजी नगर सेवक शामभाऊ चव्हाण प्रा. पवन बारहाते, करण ब्रम्हरक्षे, नेहरू युवा केंद्राच्या मानवत तालुका समन्वयक स्नेहाताई वाघमारे, प्रभाकर माळवे, समन्वयक गजानन सोनवणे, हर्षदा पंडीत, विजय रामपुरीकर, सचिन राठोड, भिसे यांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी सर्व प्रथम रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून या रक्तदान शिबिरास सुरवात करण्यात आली.
या वेळी रक्तदान शिबिरास रक्तदात्यानी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत रक्तदान केले. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी नेहरू युवा केंद्राच्या मानवत तालुका समन्वयक स्नेहाताई वाघमारे, गजानन सोनवणे यांच्या सह या वेळी सांची मित्र मंडळाच्या पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
***