सावरगाव जि.प.प्रशाळेत ; स्व. हिंदु ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

मानवत / प्रतिनिधी.
मानवत तालुक्यातील सावरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत स्व. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली.
या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून बाळासाहेबांची शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख मा. माणिकरावजी पोंडे पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आभिवादन करण्यात आले. या वेळी सरपंच गजानन घाटुळ, उप सरपंच संदीप जाधव सन्मानिय ग्राम पंचायत सदस्य रामभाऊ घाटुळ, धनंजय घाटुळ, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उद्धवरावजी घाटुळ बाळासाहेबांची शिवसेना शाखा प्रमुख मा. पंढरीनाथ भाऊ साखरे उपशाखा प्रमुख हनुमान घाटुळ, ऋषिकेश जाधव, वैभव घाटुळ, हरिश्चंद्र घाटुळ, महादेव हारकळ, वैभव जाधव, अतुल घाटुळ, बाबासाहेब टरपले, कृष्णा सातव यांची यावेळी उपस्थिती होती. जयंती निमित्त शाळेत विदयार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमास शाळेचे मुख्यध्यापक डी. एस. शिराळ, किशोर तुपसागर, भाऊसाहेब चव्हाण, सारिकाताई रब्बेवार, व्यंकट बोरगावे, यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दशरथ मुंडे यांनी केले.
***