ताज्या बातम्या
मानवत येथे बाळासाहेबांची शिवसेना तर्फे हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी_

मानवत / प्रतिनिधी.
मानवत येथे दिनांक २३ जानेवारी सोमवार रोजी बाळासाहेबांची शिवसेना तर्फे हिंदू हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सर्व प्रथम हिंदू हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुस्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना शिवसेना शहर प्रमुख शंकर भाऊ कच्छवे, युवा सेना प्रमुख शंतनु दहे, वाजेदभाई शेख, उप शहरप्रमुख बरसात सिंग बावरी, आशिषभैया घुगे, किशन ढवळशंक, गोविंद परांडे, रवी भाऊ कच्छवे, आकाश राऊत, मुक्तार शेख, यांच्या सह यावेळी बाळासाहे बांची शिवसेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.
***